लिएंडर पेस-बॅगेमॅन उपांत्यपूर्व फेरीत!

By Admin | Published: August 25, 2016 04:34 AM2016-08-25T04:34:29+5:302016-08-25T04:34:29+5:30

लिएंडर पेस याने एटीपी सर्किटमधील आपला १०८ वा जोडीदार जर्मनीचा आंद्रे बॅगेमॅन याच्याबरोबर खेळताना विन्सेंट सलेम ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Leander Paes-Baugman quarter-finals! | लिएंडर पेस-बॅगेमॅन उपांत्यपूर्व फेरीत!

लिएंडर पेस-बॅगेमॅन उपांत्यपूर्व फेरीत!

googlenewsNext


विन्सेंट-सलेम (अमेरिका) : भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस याने एटीपी सर्किटमधील आपला १०८ वा जोडीदार जर्मनीचा आंद्रे बॅगेमॅन याच्याबरोबर खेळताना विन्सेंट सलेम ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पेस-बॅगेमॅन जोडीने पहिल्या फेरीत ख्रिस गुसिकोन व आंद्रेसा यांचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पेस- बॅगेमॅन जोडीने केवळ ६५ मिनिटांत हा सामना जिंकला.
या जोडीने सहापैकी पाच
ब्रेक पॉँईट वाचविले व तीन वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस
तोडली. पुढील फेरीत त्यांचा सामना पोलंडचा लुकास कुबोत व सर्बियाचा नेनाद जिमोनजिच या जोडीशी होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Leander Paes-Baugman quarter-finals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.