भारत-फ्रान्स आज लढत

By admin | Published: August 2, 2015 11:36 PM2015-08-02T23:36:30+5:302015-08-02T23:36:30+5:30

गेल्या काही आठवड्यांतील वादविवादानंतर भारतीय हॉकी संघ उद्या फ्रान्सविरुद्धच्या लढतीने आपल्या युरोपियन दौऱ्याची सुरुवात करणार आहे.

India-France fight today | भारत-फ्रान्स आज लढत

भारत-फ्रान्स आज लढत

Next

ला तोकेट (फ्रान्स) : गेल्या काही आठवड्यांतील वादविवादानंतर भारतीय हॉकी संघ उद्या फ्रान्सविरुद्धच्या लढतीने आपल्या युरोपियन दौऱ्याची सुरुवात करणार आहे.
परदेशी प्रशिक्षक नेदरलँडचा पॉल वॉन ऐस यांचा तीन वर्षांचा करार पाच महिन्यांच्या आतच बरखास्त केला गेल्यानंतर येथे पोहोचलेला संघ फ्रान्समध्ये दोन सामने खेळल्यानंतर तीन सामन्यांसाठी स्पेनला रवाना होणार आहे.
भारताने नुकत्याच झालेल्या बेल्जियम येथील विश्व लीग सेमीफायनल्समध्ये फ्रान्सला पराभूत केले होते आणि या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानी राहिला होता.
ओल्टमन्स यांनी भारतीय संघ यजमानाविरुद्ध गांभीर्याने खेळणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्ही गेल्या सामन्यात फ्रान्सला पराभूत केले आहे; परंतु आम्ही
त्यांना सहजपणे घेणार नाही. ते
युरो हॉकी चॅम्पिनशिपसाठी तयारी
करीत आहेत आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला ते सगळ्याच संधीचा फायदा घेऊ इच्छितात. भारतीय मुलांनीही चांगली सुरुवात केली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी व्यूहरचनाही आखली आहे. हा दौरा आम्हाला आमची व्यूहरचना
आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आणि खेळाडूंचे कौशल्य अजमावण्यास मदत करील.’
सराव सत्रानंतर कर्णधार सरदारसिंह म्हणाला की, ‘फ्रान्सचा संघ चांगला आहे आणि त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. आम्ही
त्यांना सहजपणे घेऊ शकत नाही.
आम्ही आमच्या व्यूहरचनेनुसार खेळणार आहोत. बेल्जियममध्ये
गेल्या आठवड्यात त्यांनी त्यांची
गती आणि सुरुवातीला गोल करताना आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला होता. या वेळेस असा धक्का देण्याची संधी आम्ही त्यांना देणार नाही आणि चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू. काही महत्त्वाच्या खेळाडूंचेही संघात पुनरागमन झाले आहे.
ज्यामुळे आमचा डिफेन्स आणि फॉरवर्ड फळी मजबूत होणार आहे. आमच्या संघात काही युवा खेळाडूदेखील आहेत.’ (वृत्तसंस्था)

Web Title: India-France fight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.