आशियाई स्पर्धेत भारताला कांस्य पदक

By Admin | Published: September 22, 2014 10:03 AM2014-09-22T10:03:10+5:302014-09-22T13:15:11+5:30

आशियाई स्पर्धेत राही सरनोबत, हिना सिद्धू आणि अनिसा सय्यद या तिघींनी नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय संघाला कांस्य पदक मिळाले

India bronze medal in Asian Games | आशियाई स्पर्धेत भारताला कांस्य पदक

आशियाई स्पर्धेत भारताला कांस्य पदक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

इंचियोन, दि. २२ - आशियाई स्पर्धेत नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय संघाला कांस्य पदक मिळाले आहे. राही सरनोबत, हिना सिद्धू आणि अनिसा सय्यद या तिघींनी भारताला आशियाई स्पर्धेत भारताला पाचवे पदक मिळवून दिले असून स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकललाही कांस्य पदक मिळाले आहे.  

आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये २५ मीटर पिस्तूल (सांघिक) या प्रकारात महाराष्ट्र कन्या राही सरनोबत (५८९),  हिना सिद्धू (५७२) आणि अनिसा सय्यद (५७७) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७२९  गुण मिळवत कांस्य पदकावर नाव कोरले.   पदक तालिकेत १ सुवर्ण व पाच कांस्य पदकासह भारत १२ व्या स्थानावर आहे. 

सोमवारी २५ मीटर पिस्तूल वगळता अन्य खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाच केली. नेमबाजीतील १० मीटर एअर रायफल टीम व वैयक्तिक प्रकारात भारतीय नेमबाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. सांघिकमध्ये महिला नेमबाजांचा भारतीय संघ सहाव्या स्थानावर  घसरला. तर वैयक्तिक प्रकारात अयोनिका पाल सातव्या क्रमांकावर घसरली. सायकलिंगमध्येही भारतीय सायकलिंगपटूंना १३ व्या व १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर जलतरणमधील बॅकस्ट्रोक हिटमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात भारतीय जलतरणपटू सपशेल अपयशी ठरले. 

Web Title: India bronze medal in Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.