इंचियोन. फुल्ल ऑन.!

By admin | Published: September 20, 2014 01:53 AM2014-09-20T01:53:47+5:302014-09-20T01:53:47+5:30

विविध सादरीकरणासह दक्षिण कोरियाच्या इंचियोन शहरात 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज, शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले.

Incheon Full on.! | इंचियोन. फुल्ल ऑन.!

इंचियोन. फुल्ल ऑन.!

Next
गंगनम स्टाईलची धूम : इतिहासाला उजाळा देत नृत्य, संगीताच्या साक्षीने आशियाई स्पर्धेचे रंगतदार उद्घाटन
इंचियोन : आशिया खंडाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत लोकसंगीताने सजलेली सायंकाळ.., सोबतीला एकाहून एक रंगतदार कार्यक्रम.. लोकप्रिय गंगनम स्टाईलची धूम.. अशा विविध सादरीकरणासह दक्षिण कोरियाच्या इंचियोन शहरात 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज, शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले. 
उद्घाटन सोहळ्यात यजमान राष्ट्राने सांस्कृतिक परंपरेचा परिचय देत नावाजलेल्या कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकली. समारंभाला सुरुवात झाली ती आशिया खंडाच्या ऐतिहासिक सादरीकरणापासून. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आशियातील अनेक देश समुद्राच्या माध्यमातून एकमेकांच्या कसे जवळ आले हे दाखविण्याचा प्रयत्न होता. अर्धा तासाच्या सादरीकरणात कलावंतांनी प्राचीन काळातील संस्कृतीला उजाळा दिला. यात भारतासह अन्य देशांशी झालेला संपर्क डिजिटल तंत्रद्वारे दाखविण्यात आला. भारताला दाखविण्यासाठी ताजमहालची प्रतिकृती स्क्रिनवर सादर झाली. उद्घाटन सोहळ्याचे सादरीकरण किम सुजोंग जू आणि यूंग यियोंग यांनी केले. 4 ऑक्टोबर्पयत चालणा:या या क्रीडा महाकुंभात यजमान शहर इंचियोनची संस्कृती, संगीत, नृत्य सादर झाले तेव्हा संपूर्ण स्टेडियम सूरमय झाले होते. समारंभात जवळपास दहा हजार खेळाडू आणि स्थानिक कलावंत सहभागी झाले होते. प्रसिद्ध पीएसवाय ग्रुपने संगीताची धून सादर करताच उपस्थितांनी संगीताच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी अतिथि असलेले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद, अल फहाद अल सबाह यांनी देखील चार तास चाललेल्या या सोहळ्याचा 6क् हजार प्रेक्षकांसोबत आनंद लुटला.
कोरियाचा पॉप स्टार बिग बँग, सीन ब्ल्यू, एक्सो आणि अभिनेता जँग डोंग गून तसेच किम सू ह्यून यांनी मंचावर कला सादर करीत भरपूर मनोरंजन केले. यांनतर ओन्ली वन आशिया हे गीत सादर झाले. यात 45 देशांमधील 13 हजार खेळाडूंच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
स्थानिक 919 गायकांनी सूर छेडताच सर्वानी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यानंतर सुरू झाले ते खेळाडूंचे पथसंचलन. 45 देशांचे खेळाडू आपापल्या राष्ट्रध्वजासह शिस्तीत मैदानावर आले. सर्वात शेवटचे पथक यजमान राष्ट्राचे होते. या संचलनात भारताचा ध्वज उंचावण्याचा मान सरदारासिंग याला मिळाला. (वृत्तसंस्था)
 
ओसीए अध्यक्ष अल सबाह यांनी यांनी आपल्या संदेशात आशियाई देश आणि खेळाडूंचे अभार मानले तसेच आशियाड यशस्वी करण्याचे आवाहन केले. पाठोपाठ दक्षिण कोरियाच्या माजी चॅम्पियन खेळाडूंनी क्रीडाध्वज आणि कोरियाचा ध्वज तसेच आशियाडचा ध्वज आणला. यानंतर संगीत आणि ध्वनिप्रकाश यांची सुरेख मेजवानी सादर करण्यात आली तेव्हा इंचियोनचे आकाश पांढ:या शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखे दिसत होते. 
उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरले ते दीपप्रज्वलन. दीपप्रज्वलन कोण करेल हे अधिका:यांनी अखेर्पयत गुलदस्त्यात ठेवले होते.  कोरियाच्या माजी पदक विजेत्यांनी स्टेडियमला वळसा घालून क्रीडाज्योत एकमेकांकडे सोपविली. अखेरीस दोन मुलांना क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळाला. विश्व प्रसिद्ध गंगनम स्टाईल नृत्याने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.(वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Incheon Full on.!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.