म्हणून ICC चेअरमनपदी पुन्हा शशांक मनोहर

By admin | Published: March 24, 2017 04:51 PM2017-03-24T16:51:41+5:302017-03-24T16:52:07+5:30

15 मार्च रोजी शशांक मनोहर यांनी तडकाफडकी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. एप्रिलमधल्या वार्षिक परिषदेत आयसीसीच्या आर्थिक मॉडेलची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

ICC chief Shashank Manohar again | म्हणून ICC चेअरमनपदी पुन्हा शशांक मनोहर

म्हणून ICC चेअरमनपदी पुन्हा शशांक मनोहर

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढेही ते आयसीसीच्या चेअरमनपदी कायम राहतील. शंशाक मनोहर यांच्या या निर्णयानंतर आयसीसीच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 मार्च रोजी शशांक मनोहर यांनी तडकाफडकी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. एप्रिलमधल्या वार्षिक परिषदेत आयसीसीच्या आर्थिक मॉडेलची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

शशांक मनोहर यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. परिषदेच्या विनंतीला मान देऊन अखेर मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले आहे, अस आयसीसीने म्हटले आहे.

आयसीसीची वार्षिक परिषद एप्रिलमध्ये होत असून, त्यात मनोहर यांच्या वारसदाराची निवड करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत तोवर आपण अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली असल्याचे आयसीसीने म्हटलं आहे. 

शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा
100 टक्के फिट असलो, तरच खेळणार - विराट कोहली
चौथ्या कसोटीतून विराट कोहलीची माघार?

आयसीसीच्या बैठकीत मनोहर यांनीच अध्यक्षपदावर कायम राहण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. आयसीसी बोर्डाने दाखवलेल्या विश्वासाचा आदर राखून मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. मे 2016 मध्ये मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, मनोहर यांनी वैयिक्तक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात होतं .

2019 च्या वर्लकपमध्ये खेळण्यावर धोनीचा खुलासा 
स्मिथला रोखण्यासाठी विराटच्या भात्यात नवे अस्त्र 
विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प
 
 

Web Title: ICC chief Shashank Manohar again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.