डी. गुकेशने रचला इतिहास, कँडेडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली, आता विश्वविजेत्याला देणार आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:27 AM2024-04-22T10:27:39+5:302024-04-22T10:28:05+5:30

D. Gukesh Wins Candidates Chess Tournament: या विजेतेपदाबरोबरच डी. गुकेश हा ४० वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांनी रचलेला विक्रम मोडत जागतिक विजेतेपदाच्या शर्यतीमधील सर्वात कमी वयाचा आव्हानवीर ठरला आहे.

Candidates Chess Tournament: D. Gukesh made history, won the Candidates Chess Tournament, now to challenge the world champion | डी. गुकेशने रचला इतिहास, कँडेडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली, आता विश्वविजेत्याला देणार आव्हान  

डी. गुकेशने रचला इतिहास, कँडेडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली, आता विश्वविजेत्याला देणार आव्हान  

भारताचा अवघा १७ वर्षांचा बुद्धिबळपटू डी. गुकेश याने  कॅनडामधील टोराँटो इथे सुरू असलेल्या कँडेडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदाबरोबरच डी. गुकेश हा ४० वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांनी रचलेला विक्रम मोडत जागतिक विजेतेपदाच्या शर्यतीमधील सर्वात कमी वयाचा आव्हानवीर ठरला आहे. स्पर्धेतील १४ व्या आणि शेवटच्या फेरीत  गुकेश याने अमेकिरेच्या हिकारू नाकामुराविरोधातील डाव बरोबरीत सोडवला. तसेच स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळवले. कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा ही विश्वविजेत्या बुद्धिबळपटूला आव्हान देणारा बुद्धिबळपटू निवडण्यासाठी आयोजित केली जाते. 

दरम्यान, कँडेडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर आता यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या लढतीमध्ये डी. गुकेश याची गाठ चीनचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डिंग लिरेन याच्याशी पडणार आहे. डी. गुकेश हा या लढतीसाठी पात्र ठरलेला सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. याआधी महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनी १८८४ मध्ये २२ वर्षांचे असताना अनातोली कारपोव्ह यांच्याविरुद्ध होणाऱ्या लढतीसाटी क्वालिफाय केलं होतं.  

दरम्यान, या विजयानंतर गुकेश याने सांगितलं की, या विजयामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोमनियाच्ची यांच्या खेळाला फॉलो करत होते. त्यानंतर मी आणखी एक बुद्धिबळपटू ग्रेगोरज गाजेव्स्की यांच्याशीही चर्चा केली. मला वाटतं ती चर्चा खूप उपयुक्त ठरली.   

Web Title: Candidates Chess Tournament: D. Gukesh made history, won the Candidates Chess Tournament, now to challenge the world champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.