मोदींशी चर्चा करुन NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 30, 2014 02:43 PM2014-09-30T14:43:41+5:302014-09-30T18:16:51+5:30

अनंत गीते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतले आहे.

Talking to Modi, we will decide to exit the NDA - Uddhav Thackeray | मोदींशी चर्चा करुन NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे

मोदींशी चर्चा करुन NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि. ३० - अनंत गीते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतले आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

जागावाटपावरुन राज्यातील २५ वर्ष जुनी युती तुटली असली तरी शिवसेनेने केंद्रातील एनडीए सरकारचा पाठिंबा अद्याप काढलेला नाही. यावरुन मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या टीकेनंतर सोमवारी उद्धव ठाकरेंनी मोदी अमेरिकेतून परतल्यावर अनंत गीते राजीनामा देतील असे सांगितले होते. आता मात्र त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याविषयी सावध भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी अमेरिका दौ-यातून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेऊ. 
आरपीआय नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर मंगळवारी डांगळेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेनेच्या मदतीला अर्जुन धावून आला अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी डांगळेंचे स्वागत केले. 

Web Title: Talking to Modi, we will decide to exit the NDA - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.