अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 02:09 PM2024-04-17T14:09:20+5:302024-04-17T14:12:30+5:30

देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे.

PM Narendra Modi watched the Surya Tilak on Ram Lalla after his rally in Nalbari, Assam | अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल

अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल

देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे. आज रामललाचा दिव्य राज्याभिषेक झाला आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामललाचा 'सूर्यतिलक'. दुपारी १२ वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. राम मंदिरात जेव्हा रामललाचा सूर्य टिळक सोहळा होत होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पण जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये अयोध्येतील रामललाच त्या अद्भुत क्षणी पाहिले. खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला आहे.

Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

पीएम मोदी जेव्हा राम ललाच्या सूर्य टिळकांचा अद्भूत क्षण पाहत होते तेव्हा त्यांच्या पायात बूट नव्हते. पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये रामललाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला. पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नलबारी सभेनंतर मला अयोध्येत रामललाच्या सूर्य टिळकांचा अद्भुत आणि अनोखा क्षण पाहण्याचे भाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील'.

रामनवमीच्या मुहूर्तावर बुधवारी अयोध्येत आरसे आणि भिंगांचा समावेश असलेल्या विस्तृत यंत्रणेद्वारे रामललाचे 'सूर्य टिळक' करण्यात आले. या यंत्राद्वारे सूर्याची किरणे रामाच्या मूर्तीच्या कपाळापर्यंत पोहोचली. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या नवीन मंदिरातील राम मूर्तीच्या अभिषेकानंतर ही पहिली रामनवमी आहे.

मंदिराचे प्रवक्ते प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 'सूर्य टिळकांचे दर्शन सुमारे चार-पाच मिनिटे करण्यात आले, सूर्याची किरणे थेट राम लालांच्या मूर्तीच्या कपाळावर केंद्रित झाली. 

सीएसआयआर-सीबीआरआय, रुरकीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डीपी कानुंगो म्हणाले, 'योजनेनुसार, शास्त्रज्ञांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता रामललाच्या सूर्य टिळकांची चाचणी केली.'सूर्य टिळक प्रकल्पाचा मूळ उद्देश रामनवमीच्या दिवशी श्री रामाच्या मूर्तीच्या डोक्यावर टिळक लावणे हा आहे.' असं शास्त्रज्ञ डॉ. एसके पाणिग्रही म्हणाले होते.

Web Title: PM Narendra Modi watched the Surya Tilak on Ram Lalla after his rally in Nalbari, Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.