पेट्रोल-डिङोल स्वस्त होणार

By admin | Published: November 28, 2014 11:44 PM2014-11-28T23:44:19+5:302014-11-28T23:44:19+5:30

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे भारतात पेट्रोल-डिङोल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Petrol-diesel will be cheaper | पेट्रोल-डिङोल स्वस्त होणार

पेट्रोल-डिङोल स्वस्त होणार

Next
जागतिक बाजार : कच्चे तेल 4 वर्षाच्या नीचांकावर, भारतीय कंपन्यांचा तोटा भरून निघणार
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे भारतात पेट्रोल-डिङोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. 
भारतात वापरल्या जाणा:या खनिज तेलापैकी दोनतृतीयांश तेल आयात केले जाते. जागतिक बाजारात तेल स्वस्त झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांचे आयात बिल आपोआप कमी होईल. 
त्याचा लाभ घेऊन कंपन्या पेट्रोल-डिङोल स्वस्त करू शकतात. भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल वापरकर्ता देश आहे. भारत दरवर्षी 190 दशलक्ष टन कच्चे तेल आयात करतो. त्यापोटी तेल कंपन्यांना 145 अब्ज डॉलर मोजावे लागतात. 
तेल कंपन्यांशी संबंधित एका अधिका:याने सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण अशीच चालू राहिल्यास राजधानी दिल्लीत पेट्रोल 60 रुपये लिटर होऊ शकते. सध्या ते 65 रुपये लिटर आहे. असे झाल्यास महागाई निर्देशांक झटक्यात खाली येईल. 
मुंबईत पेट्रोल 71.91 रुपये लिटर आहे. सरकारला व्याज दर कपातीचा निर्णय घेणो सोपे होईल. अंतिमत: देशाचा वाढीचा दर सुधारेल. ऑक्टोबरमध्ये भारतातील किरकोळ महागाईचा दर 5.52 टक्के होऊन तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला आहे. ठोक महागाईचा दर 1.77 टक्के झाला आहे. भाजीपाला आणि पेट्रोलच्या दरातील कपातीमुळे ही कपात झाली. 
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तेल उत्पादनात कपात नाही
च्तत्पूर्वी, तेलाच्या घसरत्या किमतीच्या पाश्र्वभूमीवर 12 तेल उत्पादक राष्ट्रांची (ओपेक) एक बैठक व्हिएन्ना येथे झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत जूनपासून 30 टक्क्यांची घसरण झाली असली तरी तेल उत्पादनात कपात न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 
कच्चे तेल चार वर्षाच्या नीचांकावर
च्ओपेक राष्ट्रांचा निर्णय येताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या. ब्रेंट क्रूड तेल शुक्रवारी 9 सेंटस्नी उतरून प्रतिबॅरल 72 डॉलरवर पोहोचले. जुलै 2010 नंतरची ही सर्वात कमी किंमत आहे. त्या महिन्यात कच्चे तेल 71.25 डॉलरवर होते. 

 

Web Title: Petrol-diesel will be cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.