पाकची गुप्तचर संघटना दाऊदला हलविणार

By admin | Published: November 25, 2014 01:29 AM2014-11-25T01:29:18+5:302014-11-25T01:29:18+5:30

कुख्यात गुंड व 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाक-अफगाण सीमेवरील वजिरीस्तान येथे लपून बसला आहे;

Pakistan's spy agency will move to Dawood | पाकची गुप्तचर संघटना दाऊदला हलविणार

पाकची गुप्तचर संघटना दाऊदला हलविणार

Next
नवी दिल्ली : कुख्यात गुंड व 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाक-अफगाण सीमेवरील वजिरीस्तान येथे लपून बसला आहे; पण पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय त्याला तेथून हलविण्याच्या विचारात असून, दाऊदसाठी सुरक्षित स्थळ शोधण्याची कसरत चालू आहे. थायलंड, नैरोबी, अरब अमिरात वा बांगलादेश या ठिकाणी दाऊदला हलविण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला आहे; पण त्यात यश मिळालेले नाही. अरब अमिरातीत हलविण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. बांगलादेशचे भारताशी चांगले संबंध असल्याने तेही नाव बाद झाले. आयएसआय तसेच लष्कराच्या अधिका:यांवर दाऊदच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारतातील दहशतवाद स्थानिक पातळीवर विकसित झालेला नसून, शेजारच्या देशाचे त्याला समर्थन आहे, असे म्हटले आहे. 
 

 

Web Title: Pakistan's spy agency will move to Dawood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.