पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !

By admin | Published: August 13, 2016 06:18 AM2016-08-13T06:18:36+5:302016-08-13T06:18:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर

Pak-occupied Kashmir is part of India! | पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !

पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात नागरिकांवर पाकिस्ताकडून होत असलेले अत्याचार भारतीयांनी जगासमोर आणावेत, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे असा पहिला उल्लेख इतर कोणी नाही तर पीडीपीचे खासदार मुज्जफर बेग यांनी सर्व पक्षीय बैठकीत केला होता. बेग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मी भारताचाच भाग आहे. त्यामुळे कोणीही पाकव्याप्त काश्मीर कोणाच्याही हाती जाता कामा नये.

डोळ्यांत अंजन घालणारे भाषण
- या परिस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला. तेथील सरकारशी चर्चा करूनच त्याची वेळ आणि तारीख ठरविली जाईल.
- मुज्जफर बेग यांचे भाषण बैठकीत डोळ््यांत अंजन घालणारे ठरले. ते म्हणाले खोऱ्यातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झालेला आहे.
- सीताराम येचुरी (माकप) यांनी मोदी यांना त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी असलेल्या ‘हॉटलाईन’चा वापर करून काही तरी आवश्यक करावे, असे म्हटले.

काश्मीरमध्ये पॅलेट् गन्सचा वापर थांबवा
खोऱ्यात शांतता पुन:स्थापन करण्यासाठी सगळ््या पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. परंतु निदर्शने मोडून काढण्यासाठी होत असलेला पॅलेट् गन्सचा वापर थांबविण्यात यावा, असे मत सर्वांनीच व्यक्त केले.

वातावरण पोषक नाही
दोन नेत्यांनी चर्चा फुटीरवाद्यांसह सर्वांशी चर्चा करण्याची सूचना केली. आर्म्ड फोर्सेस अ‍ॅक्ट मागे घेणे कितपत परिणामकारक ठरते हे बघण्यासाठी एखाद्या छोट्याशा नागरी वसाहतीतून तो मागे घ्यावा अशी सूचना केली. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की ही वेळ तो उपाय करण्यास पोषक नाही.

मी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी बोललो. तेथील परिस्थिती गंभीर आहे. आधी लोक काश्मिरी ओळखीबद्दल बोलत. आता तरुण मुले इसिसकडे चालली आहेत. हुरियतच्या हातातून नेतृत्व निसटून गेले आहे. त्यामुळे तेथील तापलेली परिस्थिती निवळण्यासाठी उपाय आवश्यक आहे.
- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी

आपण काश्मिरी जनतेची काळजी करणारे आहोत हे केंद्र सरकारने दाखविणे आवश्यक आहे. - मनमोहनसिंग

परिस्थितीत सुधारणा झाली व सरकारने पावले उचलली तरच आमचे समाधान होईल.
- गुलाम नबी आझाद

Web Title: Pak-occupied Kashmir is part of India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.