नेरीच्या तरुणाने दहा तरुणांना घातला सहा लाखात गंडा एकाला घेतले ताब्यात : रेमंड कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले

By admin | Published: October 21, 2016 12:17 AM2016-10-21T00:17:15+5:302016-10-21T00:17:15+5:30

जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून नेरी गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी प्रत्येकी ६० हजार या प्रमाणे दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Nari's youth took ten young people in one and a half, and took one of them in the possession of a man: Raymond was lured to work in the company. | नेरीच्या तरुणाने दहा तरुणांना घातला सहा लाखात गंडा एकाला घेतले ताब्यात : रेमंड कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले

नेरीच्या तरुणाने दहा तरुणांना घातला सहा लाखात गंडा एकाला घेतले ताब्यात : रेमंड कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले

Next
गाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून नेरी गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी प्रत्येकी ६० हजार या प्रमाणे दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रायपूर येथील भूषण अशोक परदेशी व गणेश गोटू विसपुते हे दोघं जण मे महिन्यात रितेश भिमसिंग परदेशी या तरुणाच्या घरी गेले होते. गणेशच्या माध्यमातून मला रेमंड कंपनीत लिपीक म्हणून नोकरी लागली आहे, तुलाही नोकरी हवी असेल तर कंपनीत महेश गुप्ता हे असिस्टंट मॅनेजर गणेशचे ओळखीचे आहेत. १ लाख २० हजार रुपये घेवून ते नोकरी मिळवून देतात, त्यासाठी निम्मे रक्कम ६० हजार रुपये आधी द्यावे लागतील असे भूषण याने रितेशला सांगितले. यावेळी त्याने रेमंडचे नियुक्त पत्रही दाखविले. भूषण हा ओळखीचा व नात्यातीलच असल्याने रितेश याने आई, वडिलांसमक्ष ६० हजार रुपये दिले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे पत्र आणले
पैसे घेतल्यानंतर १४ मे २०१६ रोजी भूषण व गणेश हे दोघंहीजण रितेशच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी रेमंड कंपनीच्या लेटरपॅडवर इंग्रजीत मजकूर असलेले पत्र दिले. त्यात सप्टेबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधित प्रशिक्षण पूर्ण केल्याचा उल्लेख होता. त्यानंतर २० मे रोजी पुन्हा दोघांनी एक पत्र आणले. त्यात तुम्हाला कायम करण्यात येत असल्याचा उल्लेख होता. लिपीक पदासाठी १ लाख ६५ रुपये वार्षिक वेतन देण्यात येईल असेही त्यात होते. २७ जून रोजी पुन्हा एक पत्र त्यांनी आणून दिले. त्यात नियुक्तीला उशिर होत असल्याने वेतनाच्या ८५ टक्के भरपाई देण्यात येईल. ८ऑगस्ट रोजी पुन्हा १९ ते २३ सप्टेबर मध्ये कायम करण्याचे पत्र दिले.

Web Title: Nari's youth took ten young people in one and a half, and took one of them in the possession of a man: Raymond was lured to work in the company.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.