पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:05 PM2024-04-17T20:05:39+5:302024-04-17T20:10:37+5:30

lok sabha election 2024 1st phase : 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालासह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...

lok sabha election 2024 1st phase campaigning ends 102 seats in 21 states go to polls on 19 April know about Maharashtra | पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (१७ एप्रिल) सायंकाळी संपला. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. देशातील 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी हे मतदान होणार असून 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालासह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या राज्यांमध्ये होणार मतदान - 
19 एप्रिलला, उत्तर प्रदेशातील आठ, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील सहा, आसाममधील पाच, बिहारमधील चार, महाराष्ट्रातील पाच, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन, त्रिपुरामधून एक, उत्तराखंडमधील सहा, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यात हे दिग्गज मैदानात- 
महाराष्ट्रातील नागपूर मतदार संघातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपले नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची फाईट माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या सोबत आहे. तर आसामच्या दिब्रूगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीच्या मैदानात आहेत.

महाराष्ट्रात कुठे होणार पहिल्या टप्प्यातील मतदान? -

  • नागपूर -

नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस)

  • चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

  • रामटेक- 

राजू पारवे (शिंदे गट) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

  • भंडारा गोंदिया -

सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस)

  • गडचिरोली-चिमूर - 

अशोक नेते  (भाजप) वि. नामदेव किरसान (काँग्रेस)

 

Web Title: lok sabha election 2024 1st phase campaigning ends 102 seats in 21 states go to polls on 19 April know about Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.