अंदमान, लक्षद्वीप बेटांसाठी मोठी दूरसंचार योजना

By admin | Published: July 23, 2014 12:55 AM2014-07-23T00:55:45+5:302014-07-23T00:55:45+5:30

स्थिर व बळकट दूरसंचार नेटवर्कने जोडण्यासाठी 2,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची योजना राबवण्याची शिफारस केली आहे.

Large telecom plan for Andamans, Lakshadweep islands | अंदमान, लक्षद्वीप बेटांसाठी मोठी दूरसंचार योजना

अंदमान, लक्षद्वीप बेटांसाठी मोठी दूरसंचार योजना

Next
नवी दिल्ली : दूरसंचार नियामक ट्रायने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांना स्थिर व बळकट दूरसंचार नेटवर्कने जोडण्यासाठी 2,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची योजना राबवण्याची शिफारस केली आहे. या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना सध्या सॅटेलाईटच्या माध्यमातून दूरसंचार सेवा पुरविली जाते.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने अंदमान-निकोबार व लक्षद्वीप या बेटांवर विश्वसनीय आणि गुणवत्तापूर्ण दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्याकरिता 2,277.87 कोटी रुपये खर्च करण्याची शिफारस केली. यापैकी अंदमान-निकोबारसाठी 1,772.91 कोटी रुपये आणि लक्षद्वीपकरिता 5क्4.96 कोटी रुपये खर्च केले जातील. 
या भागांना केबलने जोडण्यासोबतच उपग्रहाधारित संपर्कही कायम ठेवण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत.
अंदमान-निकोबारमध्ये 576 बंदरांपैकी 29 वर मानवी वस्ती आहे. 9क् टक्के लोकसंख्या उत्तर, मध्य व दक्षिण अंदमान या तीन बंदरांवर राहते. लक्षद्वीपमध्ये 36 पैकी 11 लोक राहतात आणि 1क् बंदरांवर 1क्क् हून अधिक नागरिक वास्तव्य करतात. लक्षद्वीपसाठी ट्रायने 1क् गावांना दूरसंचार सेवांनी जोडण्याची शिफारस केली आहे.
अंदमान-निकोबार बेटावर चार दूरसंचार कंपन्या सेवा देतात. यात सरकारी कंपनी बीएसएनएलसह एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स यांचा समावेश आहे. लक्षद्वीपमध्ये सध्या केवळ बीएसएनएल आणि एअरटेल याच कंपन्यांची दूरसंचार सुविधा उपलब्ध आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Large telecom plan for Andamans, Lakshadweep islands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.