केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Published: May 31, 2016 01:54 AM2016-05-31T01:54:57+5:302016-05-31T01:54:57+5:30

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

KCPPark's water supply system for 7 days: NMC's ignorance in amendment | केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

Next
गाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कानळदा रोडवरील नाल्यांची जेसीबी व्दारे साफसफाई करीत असताना पाच दिवसापूर्वीच जलवाहिनी फुटली आहे. या भागात २४ मे रोजी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर २७ मे रोजी या भागात पाणी पुरवठा होणार होता त्याच दिवशी नालेसफाई करणार्‍या जेसीबीचा नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहीनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनी फुटून पाच दिवस झाले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे २४ तारखेपासून याभागात पाणीपुरवठाच झालेला नाही. नागरिकांना पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. तब्बल पाच दिवस उलटूनदेखील मनपाकडून दुरुस्तीला किरकोळ कारणांसाठी विलंब केला जात आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जेसीबी व पाईप मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मनपाकडे दुरुस्तीचे साहित्य नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणी नसतांना टॅंकरची व्यवस्था करण्यात आली नाही.
गेल्या सात दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पाण्याच्या टॅंकरसाठी वार्डाच्या नगरसेवक संगीता दांडेकर यांना संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. राजू पटेल यांनी सोमवारी काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखेर महापौरांना विनंती केल्यावर त्यांनी या भागात टँकर पाठविला. त्यावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कानळदा रोड भागात के.सी.पार्क,विजय नगर,त्रिभुवन कॉलनीत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईप लाईन ही नाल्यातूनच गेली आहे.तसेच याच भागात जलवाहिनी नेहमी नादुरुस्ती होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: KCPPark's water supply system for 7 days: NMC's ignorance in amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.