वाहन क्षेत्रतील सुटे भाग उद्योगाच्या आशा पल्लवित

By admin | Published: July 23, 2014 01:00 AM2014-07-23T01:00:56+5:302014-07-23T01:00:56+5:30

वाहनांची विक्री धीम्या गतीने का असेना; पण वाढू लागल्यामुळे वाहनांचे सुटे भाग बनविणा:या उद्योगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Hope of the auto parts sector industry | वाहन क्षेत्रतील सुटे भाग उद्योगाच्या आशा पल्लवित

वाहन क्षेत्रतील सुटे भाग उद्योगाच्या आशा पल्लवित

Next
नवी दिल्ली :  वाहनांची विक्री धीम्या गतीने का असेना; पण वाढू लागल्यामुळे वाहनांचे सुटे भाग बनविणा:या उद्योगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून वाहन उद्योग मंदीत होता; त्यामुळे सुटे भाग उद्योगही मंदीत खितपत पडला होता. वाहन उद्योगाची मंदी दूर होत असल्यामुळे सुटे भाग उद्योगही हळूहळू मंदीतून बाहेर येत आहे. 
चालू आर्थिक वर्षात सुटे भाग तयार करणारा उद्योग 6 टक्के वृद्धीर्पयत मजल मारील, अशी आशा ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनशी (एसीएमए) संबंधित सूत्रंनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी या उद्योगाला मंदीची झळ सोसावी लागली होती. 2क्13-14 या वर्षात या उद्योगाच्या व्यवसायात 2 टक्के घट झाल्याने 2,117 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. गेल्या काही महिन्यांत वाहन विक्रीचा वाढता जोर पाहता या वर्षी या उद्योगाचा व्यवसाय वाढविण्याची आशा निर्माण झाली आहे, अशी माहिती एसीएमएचे अध्यक्ष हरीश लक्ष्मण यांनी अलीकडेच दिली. 
वाहन विक्रीतील मंदी, वाढता भांडवली खर्च आणि व्याज, तसेच चलनातील चढ-उतारामुळे  मागचे आर्थिक वर्ष ऑटोमोटिव्ह उद्योगांसाठी अत्यंत आव्हानात्मक गेले. गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्रीचा जोर वाढला आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित व्यवसाय होण्याची आशा निर्माण झाली. चालू आर्थिक वर्षात या उद्योगात 4 ते 6 टक्के वृद्धी होईल, असेही ते म्हणाले.
गेल्या आर्थिक वर्षात या उद्योगाने जवळपास 7क् कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. वाहनांची विक्री मंदावल्याने तसेच बाजारही सुस्तावल्याने 2क्13-14 मधील गुंतवणूक त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमालीची घट झाली.  मागील आर्थिक वर्षात या उद्योगात 1.2 ते 1.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.
वाहनाच्या सुटय़ा भागांच्या निर्यातीत  2क्13-14 मध्ये 16.7 टक्के वाढ झाली. निर्यातीचा हा आकडा 61,487 कोटी रुपये होता. त्या आधीच्या वर्षात हा आकडा 52,69क् कोटी होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4वाहन उद्योगाला दुस:या क्षेत्रत विस्तार करण्याची गरज आहे. जेणोकरून जोखीम कमी करता येईल. जोखीम कमी करण्यासाठी संरक्षण, अंतराळ आणि रेल्वेसारख्या दुस:या क्षेत्रतही विस्तार करायला हवा, असे मत ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरीश लक्ष्मण यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Hope of the auto parts sector industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.