हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:31 PM2024-05-10T15:31:41+5:302024-05-10T15:36:25+5:30

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सध्या नकार दिला आहे.

hemant soren did not get relief from supreme court next hearing on interim bail will be on 13th may 2024 | हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!

हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे, झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांना निवडणूक प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर यायचे आहे. यातच हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीनासाठी दाद मागितली होती. मात्र, हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. 

हेमंत सोरेन यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सध्या नकार दिला आहे. याप्रकरणी सोमवारी होणाऱ्या जामीन याचिकेसोबत हे प्रकरणही घेण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी आपल्या याचिकेत अंतरिम जामीन अर्जावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. अशा स्थितीत हे प्रकरण निकाली निघाल्याचे सांगतानाच आता उच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल दिला आहे, त्यामुळे ही याचिका निष्प्रभ ठरली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, उच्च न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हेमंत सोरेन म्हणाले होते की, उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता, परंतु अद्याप निर्णय दिला नाही. मात्र, यावर सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने  सांगितले. त्यामुळे आता हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १३ मे रोजी सुनावणी होणार आहे. 

हेमंत सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेचे समर्थन करत याचिका फेटाळली होती. ३ मे रोजी या संदर्भात निर्णय देताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ईडीकडे पुरेसे पुरावे आहेत आणि हेमंत सोरेन यांची अटक चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. यानंतर हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हेमंत सोरेन यांच्यावतीने कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात खटला लढवत आहेत.

Web Title: hemant soren did not get relief from supreme court next hearing on interim bail will be on 13th may 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.