अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार

By admin | Published: August 22, 2014 01:53 AM2014-08-22T01:53:12+5:302014-08-22T01:53:12+5:30

अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे.

Good, not difficult days will come | अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार

अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार

Next
मुंबई : अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे. रिझव्र्ह बँकेने गुरुवारी वार्षिक अहवाल मांडला असून, याद्वारे महागाईचा इशारा देण्यात आला आहे. तर चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.5 टक्के असेल असा अंदाज दिला आहे. 
ऑगस्ट महिन्यात बँकेने पतधोरण सादर करताना महागाईचा इशारा दिला होता तसेच जानेवारी 2क्15 र्पयत 8 टक्के तर 2क्16 र्पयत 6 टक्के दरार्पयत महागाई नियंत्रणात आणणार असल्याचे सांगतिले होते. या अहवालाद्वारेही याचा पुनरूच्चर केला आहे. मंदीचा प्रभाव कमी झाला असला तरी, अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी आणखी कालावधी लागेल, असेही मत शिखर बँकेने व्यक्त केले आहे. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सून झाल्याचा परिणाम महागाई आणखी भडकण्यात होत असल्याचा इशारा यापूर्वीच अनेक अर्थतज्ज्ञांनी दिला आहे, मात्र महागाई नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले 
आहे. 
जुलै महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात जूनच्या 7.46 टक्क्यांच्या तुलनेत 7.96 टक्के इतकी वाढ झाली होती. याचा परिणाम म्हणजे, जूनमधील भाजीपाल्याच्या 16.48 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये ही वाढ 22.48 टक्क्यांर्पयत वाढल्याचे दिसून आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कपात होताना आणि प्रामुख्याने डिङोलचा प्रती लिटर तोटा कमी होत असताना पुन्हा अन्य आर्थिक कारणांमुळे महागाई भडकण्याचे संकेत रिझव्र्ह बँकेनेच दिल्याने आगामी काळात असलेल्या सणासुदीच्या काळात खिशाला आणखी चाट बसणार आहे. 
दरम्यान, वार्षिक अहवालावेळी बँकेने ताळेबंदाची आकडेवारी देखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार, बँकेच्या उत्पन्नात 13.1 टक्क्यांची घट दिसून आली असून ही घट 64 हजार 617 कोटी रुपयांची आहे. (प्रतिनिधी)
 
431 मार्च 2क्14 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझव्र्ह बँकेच्या तिजोरीत जमा, खर्च, नफा-तोटा पलिकडे जमा होणा:या अतिरिक्त संचितामध्ये 14.75 टक्क्यांची घट झाली आहे. सुमारे 52 हजार 769 कोटी रुपयांची ही घट असून प्रामुख्याने बॉन्डवरील व्याजापोटी हा पैसा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. तर उर्वरित अतिरिक्त संचित रिझव्र्ह बँकेने केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा केले आहे. 
 
4मुंबई :  यंदा पाऊस काहीसा रुसला असला तरी  गेल्या महिनाभरात पावासाच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे  कमी पावसाचा भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती उत्पादनावर होणारा परिणाम  2क्क्9 च्या तुलनेत मर्यादित स्वरुपाचा असेल, असा दावा भारतीय रिझव्र्ह बँकेने 2क्13-14 च्या वार्षिक अहवालात केला आहे.
 
4मान्सूनच्या स्थितीत काहीशी उणीव जरूर जाणवेल; परंतु, याच अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही, असे बँकेने म्हटले आहे. उर्वरित काळात पाऊस कमी झाल्यास जलाशयातील पाणी पातळी घटेल; त्याचा वीज उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे. 

 

Web Title: Good, not difficult days will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.