६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:15 AM2024-04-25T06:15:12+5:302024-04-25T06:15:35+5:30

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो

Even if 6 bullets hit, the soldier will survive; Special 'Bullet Proof Jacket' for Indian Army | ६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे. त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण करण्यास ते सक्षम आहे. 

डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. या जॅकेटमध्ये ६ गोळ्याही (स्नायपर बुलेट) घुसू शकल्या नाहीत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे जॅकेट गोळ्या, दारुगोळापासून संरक्षण देईल. कानपूर येथील डीआरडीओच्या ‘डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (डीएमएसआरडीई) हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची टीबीआरएल चंडीगड येथे चाचणी घेण्यात आली.

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो, असे मंत्रालयाने म्हटले.

‘युद्धासाठी आम्ही मागे राहणार नाही’
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्त्वावर चर्चा केली. अलीकडच्या भू-राजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले आहे की, जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात, तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाहीत. युद्धे रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक आहे, आम्ही युद्धासाठी मागेपुढे करणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Web Title: Even if 6 bullets hit, the soldier will survive; Special 'Bullet Proof Jacket' for Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.