ट्रिपल तलाकच्या संपूर्ण सुनावणी दरम्यान मुस्लिम न्यायाधीश राहिले मौन

By Admin | Published: May 19, 2017 10:51 AM2017-05-19T10:51:45+5:302017-05-19T10:51:45+5:30

ट्रिपल तलाकच्या विषयावर सलग सहा दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी चालली. पण या सहा दिवसात..

During the entire hearing of the triple divorce a Muslim judge stayed silent | ट्रिपल तलाकच्या संपूर्ण सुनावणी दरम्यान मुस्लिम न्यायाधीश राहिले मौन

ट्रिपल तलाकच्या संपूर्ण सुनावणी दरम्यान मुस्लिम न्यायाधीश राहिले मौन

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 19 - ट्रिपल तलाकच्या विषयावर सलग सहा दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी चालली. पण या सहा दिवसात मुस्लिम न्यायाधीश अब्दुल नाझीर यांनी एक शब्दही उच्चारला नसल्याचे समोर आले आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्यावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात शीख, ख्रिश्चन, पारशी, हिंदू आणि मुस्लिम न्यायाधीशांचा समावेश होता. 
 
सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश जे.एस.केहर, कुरियन जोसेफ, आर.एफ.नरीमन आणि यु यु ललित यांनी मुस्लिम धर्मातील विवाहाच्या प्रथा, परंपरांबद्दल लॉ बोर्ड आणि त्यांच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारले, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. पण हे सर्व सुरु असताना न्यायाधीश नाझीर यांनी मात्र एक प्रश्नही विचारला नाही. मुस्लिम धर्मातील प्रथा, परंपरांबद्दल त्यांना माहिती असल्या कारणाने ते काही बोलले नसावेत अशी एक शक्यता आहे. 
 
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ट्रिपल तलाकवर सुनावणी केली. यात केंद्र सरकार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, ऑल इंडिया मुस्लिम वूमेन पर्सनल लॉ बोर्ड यांनी आपली बाजू मांडली.

न्यायालयाने चिकित्सा करू नये -खुर्शिद
न्यायालयाने म्हटले आहे की, खुर्शिद म्हणतात, हे पाप आहे. पापी प्रथा श्रद्धेचा विषय असू शकतो का? ट्रिपल तलाक १४०० वर्षांपासून चालू आहे. याचे उत्तर आहे, होय. तो पूर्ण जगात सुरू आहे का?. याचे उत्तर आहे, नाही. व्यवस्था स्वत:च सांगत आहे की, हा प्रकार चुकीचा आहे. खुर्शिद यांचे असे म्हणणे होते की, न्यायालयाने याची चिकित्सा करू नये
 

Web Title: During the entire hearing of the triple divorce a Muslim judge stayed silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.