मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी

By admin | Published: September 25, 2016 04:25 PM2016-09-25T16:25:43+5:302016-09-25T16:33:23+5:30

मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Do not understand the views of the Muslims on the market- Modi | मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी

मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी

Next

ऑनलाइन लोकमत

केरळ, दि. 25 - मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका, असं वक्तव्य करून मतांसाठी मुस्लिमांना चुचकारणा-या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. समाजामध्ये एकात्मतेची भावना असली पाहिजे. भारत 125 कोटींची लोकवस्ती असलेला देश आहे. या तरुण देशाचे स्वप्न आणि संकल्पही तरुण असले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत. केरळमधल्या कोझिकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. जनसंघानं दीनदयाल उपाध्याय यांना अध्यक्ष बनवले होते. त्यांनी मुस्लिम जनतेला नेहमीच आपलं मानलं, असंही ते म्हणाले आहेत. 


राजकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचंही प्रतिपादन त्यांनी केलं आहे. भारतातील सर्व भागांसह सर्व लोकांचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी अविस्मरणीय असं योगदान दिलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

-भाजप सत्तेच्या प्रवासाला निघालेला पक्ष नाही
-आम्ही कुठल्याची प्रकारची तडजोड केली नाही
-उपाध्याय यांनी मुस्लिम जनतेला आपलं मानलं
-मुस्लिमांचा आदर करण्याची शिकवण दिली
-समाजातील मागास घटकांच्या विकासाला प्राधान्य
-पर्यावरणाचं संतुलन राखणं ही आपली जबाबदारी
-सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय

Web Title: Do not understand the views of the Muslims on the market- Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.