धोनी, अश्विन पुण्यामधून तर, रैना, जाडेजा राजकोटकडून खेळणार

By admin | Published: December 15, 2015 12:35 PM2015-12-15T12:35:58+5:302015-12-15T13:09:27+5:30

आयपीएलमधील चेन्नई आणि राजस्थान या दोन संघातील प्रमुख खेळाडूंची आज पुणे आणि राजकोट या संघांमध्ये विभागणी झाली.

Dhoni, Ashwin, Pune, Raina and Jadeja will play for Rajkot | धोनी, अश्विन पुण्यामधून तर, रैना, जाडेजा राजकोटकडून खेळणार

धोनी, अश्विन पुण्यामधून तर, रैना, जाडेजा राजकोटकडून खेळणार

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५  - इंडियन प्रिमीयर लीगच्या पुढच्या मोसमात २०१६ मध्ये महेंद्रसिंह धोनी, रविंचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ, फा डु प्लेसिस हे खेळाडू पुणे संघाकडून खेळणार आहेत तर, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, ब्रॅन्डन मॅकलम, डवेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर हे खेळाडू राजकोट संघामधून खेळणार आहेत. 

हे सर्व प्रमुख खेळाडू आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघाचे प्रतिनिधीत्व करतात मात्र आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या  संघांना दोनवर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांच्याजागी पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांचा दोन वर्षांसाठी समावेश झाला आहे. पुण्याची मालकी न्यू रायजिंग आणि राजकोटची मालकी इंटेक्स मोबाईलकडे आहे. 
 
पुणे संघाने महेंद्रसिंह धोनीसाठी  १२.५ कोटी,  अजिंक्य रहाणेसाठी ९.५ कोटी, आर. अश्विनसाठी ७.५ कोटी, स्टिव्हन स्मिथसाठी ५.५ कोटी आणि फॅफ ड्यु प्लेसिसाठी ४.५ कोटी रुपये मोजले.  
राजकोटनेही सुरेश रैनाला १२.५ कोटी, रविंद्र जाडेजाला ९.५ कोटी, ब्रॅण्डन मॅक्युलमला ७.५ कोटी, जेम्स फॉकनरला ५.५ कोटी आणि डेव्हन ब्राव्हो ४.० कोटी रुपयांना विकत घेतले. 
 
महेंद्रसिंह धोनी, आर.अश्विन, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, ब्राव्हो, मॅक्युलम याआधी चेन्नई संघामधून एकत्र खेळत होते. 
 
खेळाडूंची विभागणी करणारी ड्राफ्ट प्रोसिजर 
लिलावापूर्वी राजस्थान आणि चेन्नई संघातील प्रत्येकी २५ खेळाडू करारबध्द करण्यासाठी पुणे आणि राजकोट संघांना उपलब्ध होते. 
 
पुण्याने सर्वात कमी रक्कमेची निविदा भरली असल्याने पुणे संघाला खेळाडू निवडण्याची पहिली संधी होती. 
 
दोन्ही संघातील मिळून ५० खेळाडूंपैकी प्रत्येकी पाच खेळाडू निवडण्याची मुभा होती. 
 
मुख्य लिलाव पुढच्यावर्षी फेब्रवारी महिन्यात होणार आहे. 

Web Title: Dhoni, Ashwin, Pune, Raina and Jadeja will play for Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.