बाबा रामपालला अटक

By admin | Published: November 20, 2014 08:43 AM2014-11-20T08:43:47+5:302014-11-20T11:26:23+5:30

स्वयंघोषित बाबा रामपाल याला बुधवारी रात्री त्याच्या सतलोक आश्रमातून पोलिसांनी अटक केली.

Baba Rampal arrested | बाबा रामपालला अटक

बाबा रामपालला अटक

Next

तणावपूर्ण कोंडी फुटली : आज कोर्टात हजर करणार

बरवाला (हरियाणा) : स्वयंघोषित बाबा रामपाल याला बुधवारी रात्री त्याच्या सतलोक आश्रमातून पोलिसांनी अटक केली. रामपालच्या अटकेसोबतच मागील दोन आठवड्यांपासून रामपाल समर्थक आणि पोलीस यांच्यादरम्यान सुरू असलेली तणावपूर्ण कोंडीही फुटली आहे. रामपालला अटक होऊ नये यासाठी त्याच्या १५००० भक्तांनी आश्रमात ठाण मांडून पोलिसांना कारवाई करण्यास रोखले होते. या सर्व भक्तांना आश्रमाबाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी आश्रमात
प्रवेश केला आणि रामपालला जेरबंद केले.
या ६३ वर्षीय वादग्रस्त बाबाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी त्याला हिसारच्या न्यायालयातपुढे हजर करण्यात येईल, असे पानिपतचे पोलीस अधीक्षक सतीश बालान यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिसांना रामपालच्या खासगी कमांडोंसोबतही दोन हात करावे लागले. त्यामुळे त्याला अटक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे डीजीपी एस. एन. वशिष्ठ यांनी सांगितले.
याआधी मंगळवारी रामपालच्या याच आश्रमात चार महिलांना रहस्यमय मृत्यू झाला होता आणि दोन महिला रूग्णालयात उपचारादरम्यान दगावल्या होत्या.
रामपालला २१ नोव्हेंबरपर्यंत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी केला होता. रामपालला अटक करण्यासाठी त्यांच्या सतलोक आश्रमात गेलेल्या पोलिसांचा मंगळवारी रामपालांच्या समर्थकांसोबत भीषण संघर्ष उडाला होता. या धुमश्चक्रीत पोलीस, माध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झाले होते.
बुधवारी संपूर्ण दिवसभर रामपालच्या अटकेवरून अतिशय नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या आणि पोलिसांनी वारंवार आवाहन केल्यानंतरही तो आत्मसमर्पण न करण्यावर अडून राहिला. रामपालने आत्मसमर्पण केले नसून त्याला अटक करण्यात आली आहे, असे बालान यांनी स्पष्ट केले.
(वृत्तसंस्था)
--------------
रामपालच्या अटकेनंतर आश्रमात अडकलेल्यामहिला आणि मुलांसह अनेक समर्थक एकेक करून बाहेर पडले. आपल्याला बळजबरीने आश्रमात ठेवले आणि दार बाहेरून बंद केले होते, असे अनेकांनी सांगितले. हरियाणा पोलिसांनी रामपालविरुद्ध अनेक नवे गुन्हे दाखल केले आहेत. रामपालला शुक्रवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Baba Rampal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.