78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव

By admin | Published: August 22, 2014 01:56 AM2014-08-22T01:56:01+5:302014-08-22T01:56:01+5:30

भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत,

78 percent Indians lack savings | 78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव

78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव

Next
नवी दिल्ली : भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या  सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत, असा निष्कर्ष टॉवर्स व्ॉटसन या जागतिक व्यावसायिक कंपनीने सव्रेक्षणाअंती काढला आहे.
 चीननंतर भारतात बचतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तथापि, वाढत्या महागाईमुळे दीर्घ काळार्पयत सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवन जगता येईलच, याची भारतीयांना शाश्वतीच वाटत नाही. वाढती महागाई आणि लहान कुटुंबाची संख्या वाढल्याने सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेशा बचतीच्या मुद्यासोबत आर्थिक आणि सामाजिक समस्यांनी आव्हान निर्माण केले आहे, असे टॉवर्स व्ॉटसन इंडिया बेनिफिट्सच्या संचालक अनुराधा श्रीराम यांनी म्हटले आहे.
 भारतीय कर्मचा:यांचा बचत दर सर्वाधिक 16 टक्के असून यात भारत चीननंतर दुस:या क्रमांकावर आहे.  सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाणारी बचत पुरेशी पडत नाही. त्यासाठी अधिक बचतीची गरज आहे, असे 78 टक्के भारतीयांना वाटते. सेवानिवृत्तीनंतरच्या अपु:या उत्पन्नावर मात करण्यासाठी विविध वयोगटातील कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी अधिक बचत करण्यास महत्त्व देत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4या अहवालानुसार 56 टक्के भारतीय कर्मचा:यांची अधिक बचत करण्याची तयारी आहे.
429 टक्के भारतीय कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर आणखी काही वर्षे काम करणो पसंत करतात.
4वयाच्या 6क् व्या वर्षी सेवानिवृत्ती व्हावी, असे बहुतांश कर्मचा:यांना वाटते. त्यानुसार 5क् वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचतीला प्राधान्य देतात.
 
44क् वर्षाखाली कर्मचारी घर आणि सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यावर भर देतात, तर चाळिशी पार केलेले कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी बचतीला प्राधान्य देतात.
4   भारतातील मनुष्यबळ जगाच्या तुलनेत तरुण असल्याने त्यांना भविष्याचा विचार करण्याचा पुरेसा वेळ आहे. 

 

Web Title: 78 percent Indians lack savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.