२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

By admin | Published: October 21, 2016 12:14 AM2016-10-21T00:14:11+5:302016-10-21T00:14:11+5:30

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

25 crore worth of investment: NMC: The need for roads is important; Take the solution of solid waste and other work as opposed | २५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

Next
गाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पथदिवे, शौचालयांची कामे व्हावीत-सुनील माळी
माळी यांनी बुधवारीच याबाबत निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली आहे. कांचननगर, चौघुले प्लॉट, प्रजापतनगर, भुरेमामलेदार प्लॉट, के.सी.पार्क, इंद्रप्रस्थनगर, भोईटेनगर, पिंप्राळा, दादावाडी, निमखेडी रोड, खोटेनगर, कोल्हेनगर,शिवकॉलनी, रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पवननगर आदी भागात पाणीपुरवठा, पथदिवे, शौचालये याबाबतची कामे करावीत, अशी मागणी केली आहे.
रस्त्यांची कामेच व्हावीत- अनंत जोशी,
मनसेचे अनंत जोशी म्हणाले की, शहरातील पिण्याच्या पाईपलाईनचा विषय अमृतमधून मार्गी लागला असून भूमिगत गटारींचा विषयही एक-दोन वर्षात अमृत योजनेतूनच मार्गी लागेल. आरोग्याचा विषयही गंभीर आहे. मात्र त्यासाठी सफाई मक्ता देणे, वाहन खरेदी करणे आदी कामे १४व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम होणे आवश्यक आहे. मात्र सर्वच कामे २५ कोटींच्या निधीतून होणे शक्य नाही. त्यातुलनेत शहरातील रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रास सहन करत आहेत. त्यांच्या सोयीचा विचार करून ही कामे करणे आवश्यक आहे.
रस्ते, गटारींना प्राधान्य हवे-अश्विनी देशमुख
राष्ट्रवादीच्या अश्विनी देशमुख म्हणाल्या की, रस्ते, गटारी, व महिला शौचालयांना प्राधान्य देण्याची गरज आहे बाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर महिलांसाठी शौचालय, स्वच्छतागृह नाहीत. ती बांधावीत. तसेच शहरातील एखादा चांगला बगिचा विकसित करण्याची गरज आहे. नवीन वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स टाकण्याची गरज आहे. अमृत योजनेतून ही गरज काही प्रमाणात भागणार असली तरीही लहान आकाराच्या पाईपलाईन त्यात होणार नाहीत. त्याची कामे या निधीतून केली जावीत. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. जे रस्ते बर्‍याच वर्षांपासून झालेले नाहीत, त्यावरून वाहतूक करणार्‍या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे आजार झाले आहेत. असे रस्ते तसेच जास्तीत जास्त वापराचे रस्ते तातडीने केले जावेत. भुयारी गटारींची योजना अमृतमधून प्रस्तावित असली तरीही ती मोठी योजना असून त्याचा १० टक्के हिस्सा भरणेदेखील मनपाला अवघड होईल. त्यामुळे त्या योजनेस विलंब होणार आहे. त्यामुळे शहरातील गटारींची कामेही केली जावीत.

Web Title: 25 crore worth of investment: NMC: The need for roads is important; Take the solution of solid waste and other work as opposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.