२० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:38 AM2024-05-07T05:38:22+5:302024-05-07T05:38:36+5:30

बिहारच्या किशनगंज येथील प्रकार; मुलींचे वजन १ किलोच्या आत

20-year-old girl gives birth to 5 daughters at once; | २० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई

२० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई

एसपी सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पटणा : एका महिलेने एकाचवेळी ५ मुलींना जन्म दिल्याचा प्रकार बिहारमधील  किशनगंज जिल्ह्यात घडला असून, हा विषय संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये हा कौतुकाचा विषय झाला आहे.

ठाकूरगंज ब्लॉकमधील कनकपूर पंचायतअंतर्गत असलेल्या जलमिलिक गावात एका महिलेने एकाच वेळी ५ मुलींना जन्म दिला आहे. सर्व मुली आणि त्यांची आई निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मुलींचे वजन एक किलोच्या आत आहे. 
महिलेला आधीच तीन वर्षांचा मुलगा आहे. आता ती ६ मुलांची आई झाली आहे. कुटुंबात पाच मुली आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे.

आव्हानात्मक असतानाही केली नॉर्मल डिलिव्हरी 
nताहिरा बेगम (वय २०) असे या महिलेचे नाव आहे. ताहिरा म्हणाली की, जेव्हा मी २ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा माझ्या पोटात पाच मुले असल्याचे कळले.
nयानंतर मला भीती वाटायला लागली. मात्र, डॉक्टरांनी मला घाबरण्यासारखे काही नसल्याचे सांगितले. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ताहिर बेगमने ५ मुलींना जन्म दिला आहे. घरातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेजा नर्सिंग होमच्या डॉ. फरजाना यांनी आव्हानात्मक असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली. हे अतिशय कौतुकास्पद आहे. 

अशी प्रकरणे फार कमी वेळा समोर येतात. महिलेच्या पोटात ५ मुले असल्याचे समोर आले. महिलेला हे कळताच ती घाबरली होती. मात्र, आम्ही तिला प्रोत्साहन दिले. हे प्रकरण आव्हानात्मक होते. ती इतर नियमित तपासणीसाठी येत असे. सकाळी तिला प्रसूती वेदना होत असताना तिची प्रसूती झाली. हे प्रकरण आव्हानात्मक असतानाही महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली. - डॉ. फरजाना, रेजा नर्सिंग होम.

Web Title: 20-year-old girl gives birth to 5 daughters at once;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार