ब्राह्मणगावी दोन दुकाने फोडून हजारोंचा माल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:27 PM2019-05-02T18:27:54+5:302019-05-02T18:28:55+5:30

ब्राह्मणगाव येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील टांगो दारूचे बावीस बॉक्स, संत्रा दारूचे पाच बॉक्स असे सत्तावीस खोके असा एकूण ४४ हजार रूपयांचा माल, तर त्याच्या शेजारी आदर्श आॅटो केअर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील एक लिटरचे सर्वो कंपनी आॅइलचे डबे, नवे दुचाकीचे टायर, गल्ल्यातील रोख रक्कम रु पये असा एकूण १९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला.

Stolen goods of thousands of shops in Brahmanagavya break up | ब्राह्मणगावी दोन दुकाने फोडून हजारोंचा माल चोरीस

ब्राह्मणगावी दोन दुकाने फोडून हजारोंचा माल चोरीस

Next

ब्राह्मणगाव : येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील टांगो दारूचे बावीस बॉक्स, संत्रा दारूचे पाच बॉक्स असे सत्तावीस खोके असा एकूण ४४ हजार रूपयांचा माल, तर त्याच्या शेजारी आदर्श आॅटो केअर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील एक लिटरचे सर्वो कंपनी आॅइलचे डबे, नवे दुचाकीचे टायर, गल्ल्यातील रोख रक्कम रु पये असा एकूण १९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला.
याबाबत घटनेची माहिती पोलीसपाटील मालपाणी यांनी सटाणा पोलीस ठाण्यात दिली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे, कृष्णा गोडसे, अतुल आहेर, कैलास खैरनार यांनी पाहणी करून पंचनामा केला.
याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. हेरंब गणपती मंदिराजवळ राहत असलेले प्रताप शिरोडे हे त्यांच्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले व रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत सोने व पितळी भांडी असा हजारों रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला, तर बसस्थानकाजवळील सुनील परदेशी यांच्या दुकानाबाहेर असलेल्या जुन्या सायकलींचा साटा चोरट्यांनी चोरून नेला.
चोरांचा बंदोबस्त करण्यासह रात्रीच्या वेळी गावात व बसस्थानकाजवळील परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Stolen goods of thousands of shops in Brahmanagavya break up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.