एकतर्फी प्रेमातून तरुणीला जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:20 AM2018-08-06T01:20:30+5:302018-08-06T01:20:40+5:30

नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी फाटा) यास अटक केली आहे़

One attempt to force the woman out of love | एकतर्फी प्रेमातून तरुणीला जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे बहिणीने सोडविण्याचा प्रयत्न केला

नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी फाटा) यास अटक केली आहे़
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित रोहन हा मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. त्यास नकार दिल्याने तो बळजबरीने घरात घुसला व मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यानंतर घराबाहेर काढून सोबत येण्यासाठी जबरदस्ती करीत होता़ यावेळी बहिणीने सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण करून शिवीगाळ केली़ तसेच सोबत न आल्यास दोघींनाही ठार मारण्याची धमकी दिली.
वृद्धाचा मोबाइल खेचला
राणेनगरच्या युनिक मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला बोलत असलेल्या वृद्धाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून (एमएच १५, जीई ६३७४) आलेल्या तिघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामदास शंकर बोडके (६०, रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One attempt to force the woman out of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे