इगतपुरीत बालकाचा बुडून मृत्यू

By admin | Published: October 1, 2016 12:33 AM2016-10-01T00:33:52+5:302016-10-01T00:34:22+5:30

इगतपुरीत बालकाचा बुडून मृत्यू

Igatpuri baby drowning death | इगतपुरीत बालकाचा बुडून मृत्यू

इगतपुरीत बालकाचा बुडून मृत्यू

Next

इगतपुरी : शहरात १२ बंगला रोडजवळील ग्रीन शॉप या भरवस्तीत तीन वर्षांपासून इमारत बांधण्यासाठी तीन गुंठे जागेवर केलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पडून आमन आमिन शेख (३) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील ग्रीन शॉप वसाहतीत खोदलेल्या खड्ड्यात आजूबाजूच्या घरांचे सांडपाणी, नाल्याचे पाणी साचते. पावसाळ्यात हा खड्डा तुडुंब भरला होता. शुक्रवारी (दि. ३०) आमन आमिन शेख खेळत असताना सकाळी ११ वाजता पाच फूट खोल खड्ड्यात पडला. त्याला कोणीही पाहिले नाही. त्याची आई त्याला शोधण्यासाठी परिसरात पाहत असतानाच एका वृध्देचे लक्ष खड्ड्याकडे गेले. तिला हात वर तरंगताना दिसला. काही तरुणांनी आमनला पाण्यातून बाहेर काढले. त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मुलाचे पिता आमीन शेख (२६), रा. ग्रीन शॉप यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित इमारत बांधकाम मालकांविरूध्द तक्रार दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. यात जुनेद खान, फिरोज खान, शौकत खान अरुण जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)
वारंवार स्थानीक रहिवासी नगर पालीका प्रशासन व जागा मालकांना खड्डा बुजवा म्हणुन सांगत होते. या खडुया मुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे आसे अर्ज नगर पालीका प्रशासनाला दिले पण आज एक चिमुरडयाचा बळी या खडडयाने घेतलाच . आता तरी नगर पालीका प्रशासना ची झोप उडेल का आनखी किती चिमुरडे बळी घेणार असा अर्त सवाल करित मयत मुलाच्या नाते वाईकांनी जो पर्यंत या जागा मालकांना पोलीस ताब्यात घेत नाही तोवर प्रेतची आम्ही अंतविधी करणार नाही असा तांडव करित ग्रामिण रु ग्णालया समोर एकच गर्दी केली . या घटने मुळे परिसरात शोक पसरला असुन या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शाना खाली पोलीस उपनिरिक्षक एन . बी . सोनवणे पोलीस कर्मचारी रामदास गांगुर्डे , विनोद गोसावी , गणेश वराडे , पी .एन . मोरे , ए . बी . भाबड , आदि करित आहे. (वार्ताहर)

Web Title: Igatpuri baby drowning death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.