गुलाम बेगम बादशहा चित्रपटाला नामांकन

By Admin | Published: July 23, 2014 01:35 AM2014-07-23T01:35:05+5:302014-07-23T01:40:45+5:30

नाशिकची निर्मिती : सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार

Ghulam Begum Badshah Film Nomination | गुलाम बेगम बादशहा चित्रपटाला नामांकन

गुलाम बेगम बादशहा चित्रपटाला नामांकन

googlenewsNext

नाशिक : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या मराठी चित्रपट आणि हिरकणी पुरस्कार यासाठी नाशिककरांची निर्मिती असलेल्या ‘गुलाम बेगम बादशहा’ या चित्रपटाला नामांकन प्राप्त झाले आहे.
‘ड्रिम मर्चंट फिल्म्स’च्या या पहिल्याच निर्मितीला मिळालेल्या या यशामुळे कलावंतांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ‘गुलाम बेगम बादशहा’ या चित्रपटाला उत्कृष्ट संकलन आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीत यासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाचे संकलन अशोक रूमडे यांनी केले आहे, तर पार्श्वसंगीत शशांक पोवार यांनी दिले आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक राजू फिरके असून, निर्मिर्ती किरण वाघ यांची आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नाशिक आणि मुंबईत याचे चित्रीकरण झाले आहे. यात भरत जाधव, संजय नार्वेकर व नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाशिकच्या अनेक कलावंतांनीही या महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ghulam Begum Badshah Film Nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.