मुख्यमंत्र्यांनी घेतले दुर्गादेवीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:10 AM2017-09-23T01:10:37+5:302017-09-23T01:10:57+5:30

लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यभारतातील सर्वात मोठा नागपूर दुर्गा महोत्सव लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

The Chief Minister took the view of Durga Devi | मुख्यमंत्र्यांनी घेतले दुर्गादेवीचे दर्शन

मुख्यमंत्र्यांनी घेतले दुर्गादेवीचे दर्शन

Next
ठळक मुद्देनागपूर दुर्गा महोत्सव : लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यभारतातील सर्वात मोठा नागपूर दुर्गा महोत्सव लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या दुसºया दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन माता दुर्गेचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी स्वागत केले. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसन्ना मोहिले उपस्थित होते. महोत्सवात साकारलेल्या मेट्रो रेल्वेच्या प्रतिकृतीचा मुख्यमंत्र्यांनी अनुभव घेतला. त्यानंतर माता दुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना मंडळातर्फे स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. त्याचबरोबर महोत्सवाच्या परिसरात क्रांतिकारी भगतसिंग यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचेही त्यांनी अवलोकन केले. शुक्रवारी नागपूर दुर्गा महोत्सवाला खासदार डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. सुनिता महात्मे यांनीही भेट दिली. ‘द लिजेंड आॅफ भगतसिंग’ या सिनेमाचे सादरीकरण करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी महोत्सवात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी भगतसिंग यांच्या दुर्मिळ छायाचित्राची माहितीही अनेकांनी जाणून घेतली.
मुख्यमंत्र्यांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा
नागपूर दुर्गा महोत्सवातील आयोजन, डेकोरेशन मेट्रो रेलचा नागपूरकरांना मिळत असलेला अनुभव व तरुण आणि लहानग्यांमध्ये देशभक्तीचा भाव निर्माण करण्यासाठी भगतसिंग यांच्या दुर्मिळ छायाचित्राच्या प्रदर्शनाचे आयोजन बघून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
महोत्सवात आज
शनिवारी महोत्सवात मुंबई येथील सोनिया परचुरे आणि त्यांच्या सहकाºयांचे ‘नृत्यस्वरुप संत ज्ञानेश्वर’ या कार्यक्रमाचे सादरीकरण सायंकाळी ७ ला होणार आहे.

Web Title: The Chief Minister took the view of Durga Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.