गजभियेंनी निवडले चिचोली गाव

By admin | Published: February 21, 2016 02:48 AM2016-02-21T02:48:46+5:302016-02-21T02:48:46+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आमदार आदर्श गाव म्हणून काटोल रोडवरील चिचोली या गावाची निवड केली आहे.

Chicholi village selected by Gajbhiyani | गजभियेंनी निवडले चिचोली गाव

गजभियेंनी निवडले चिचोली गाव

Next

मुख्यमंत्र्यांना निवेदन : विकासासाठी ५० कोटींची मागणी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आमदार आदर्श गाव म्हणून काटोल रोडवरील चिचोली या गावाची निवड केली आहे. चिचोली हे गाव आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेले कपडे, पेन, जोडे, टाईपरायटर, काठी, चष्मा, टोपी आदी वस्तू शांतिवन येथे ठेवल्या आहेत. त्यामुळे दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी चिचोलीलाही भेट देतात.
या गावाचा आदर्श ग्राम म्हणून विकास करण्याचा मानस प्रकाश गजभिये यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. चिचोली गावाचा विकास करण्यासाठी प्रकाश गजभिये यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारतर्फे ५० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याचे गजभिये यांनी यावेळी सांगितले.
या शिष्टमंडळात विजय गजभिये, भूपेंद्र शनेश्वर, अजय मेश्राम, अविनाश तिरपुडे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Chicholi village selected by Gajbhiyani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.