होळीसाठी अनधिकृत वृक्षतोड पडणार महागात! तक्रारीसाठी पालिकेचा टोल फ्री क्रमांक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:44 AM2024-03-22T11:44:43+5:302024-03-22T11:45:36+5:30

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास महापालिका अधिकारी व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे

Unauthorized tree felling for Holi action will be taken bmc issue toll free number for complaints | होळीसाठी अनधिकृत वृक्षतोड पडणार महागात! तक्रारीसाठी पालिकेचा टोल फ्री क्रमांक जारी

होळीसाठी अनधिकृत वृक्षतोड पडणार महागात! तक्रारीसाठी पालिकेचा टोल फ्री क्रमांक जारी

मुंबई :

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास महापालिका अधिकारी व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला 
 १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षादेखील होऊ शकते. त्यामुळे ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास पालिकेच्या १९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

Web Title: Unauthorized tree felling for Holi action will be taken bmc issue toll free number for complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.