वैद्यकीय महाविद्यालये असुरक्षितच!

By admin | Published: September 5, 2015 02:15 AM2015-09-05T02:15:05+5:302015-09-05T02:15:05+5:30

डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने दिले होते

Medical colleges unprotected! | वैद्यकीय महाविद्यालये असुरक्षितच!

वैद्यकीय महाविद्यालये असुरक्षितच!

Next

मुंबई : डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने दिले होते. राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालावरून वैद्यकीय महाविद्यालये असुरक्षितच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संचलनालयाने पहिल्यांदा मागवलेल्या अहवालात अनेक महाविद्यालयांनी फक्त सुरक्षा रक्षकांची संख्या एकत्रित करुन पाठवली होती. पण, त्यानंतर एक नवीन आराखडा तयार करण्यात आला होता. ३ सप्टेंबरपर्यंत अहवाल देण्याची मुदत होती.
या मुदतीत राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांनी अहवाल सादर केला. तर, सद्यस्थितीला एकूणच सर्व महाविद्यालयांना सुरक्षित करण्यासाठी तब्बल ८९६ सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या अहवालातून अजून आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. १४ महाविद्यालयात एकूण ८१ वॉकी -टॉकी आहेत. पण, यापैकी एकाही वॉकी-टॉकीचा वापर केला जात नाही. सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने अजून २१० अतिरिक्त वॉकी-टॉकीची गरज आहे. एकूण ३७१ सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. पण, सुरक्षा वाढवण्याच्यादृष्टीने ६६८ अतिरिक्त सीसीटीव्हींची आवश्यकता आहे.

Web Title: Medical colleges unprotected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.