पासपोर्ट हरवला आहे?

By admin | Published: November 4, 2016 03:59 PM2016-11-04T15:59:29+5:302016-11-07T10:55:10+5:30

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र

Passport lost? | पासपोर्ट हरवला आहे?

पासपोर्ट हरवला आहे?

Next

 परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!
एका स्थानिक शॉपिंग मॉलमधून माझी बॅग चोरीला गेली. या बॅगमध्ये माझा पासपोर्ट, लॅपटॉप आणि इतर काही मौल्यवान गोष्टी आणि कागदपत्रं होती. या पासपोर्टवर अमेरिकेचा व्हिसा होता. आता मला वकिलातीत हे कळवावं लागेल का? 
- हो, अर्थात आणि अवश्य. तुमचा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला असेल तर हे तातडीनं अमेरिकन वकिलातीला कळवायला हवं. अमेरिकेचा व्हिसा बदलून मिळण्यासाठीही ही प्रक्रिया आवश्यक असते. ही प्रक्रिया अवघड वाटत असली तरी सुदैवानं ती खूपच सोपी आहे. 
यासाठी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवावा. पोलिसांकडून ही घटना कशी घडली याच्या सविस्तर अहवालाची लेखी प्रत अवश्य घ्यावी. जर तुम्ही भारताच्या बाहेर आहात आणि तिथे ही घटना घडली तर तिथल्या भारतीय दूतावासात किंवा वकिलातीत घटनेची माहिती देण्यासाठी आणि व्हिसा बदलून मिळण्यासाठी संपर्क करावा. 
पोलिसांकडे गुन्ह्याची नोंदणी झाल्यानंतर अमेरिकेच्या वकिलातीला किंवा दूतावासाला तुमचा व्हिसा कुठे जारी झाला होता हे कळवावे लागते आणि पोलिसांच्या अहवालाची एक प्रतही द्यावी लागते. 
हरवलेला किंवा चोरीला गेलेला व्हिसा पुन्हा जारी होत नाही. अमेरिकेत प्रवास करण्यासाठी नव्यानं व्हिसा मिळवावा लागतो. जर तुम्ही अमेरिकेतच असाल तर जोपर्यंत तिथे आहात त्यासाठी नवा व्हिसा आवश्यक असतो. आणि जर तुम्ही अमेरिकेतून बाहेर पडला असाल तर पुन्हा नव्यानं त्या देशात प्रवेशासाठी नवीन व्हिसाची आवश्यकता असते. 
व्हिसा हरवला आहे अशी नोंद झाली की सिस्टिममधूनही तो रद्द होतो. अशी नोंद केल्यावर हरवलेला पासपोर्ट सापडला तरी नवीन व्हिसा मिळवणं आवश्यकच असतं. 
प्रवासात असताना/नसतानाही तुमच्या पासपोर्टवरच्या वैयक्तिक माहितीच्या पानाची, व्हिसाची आणि अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर तिथे मिळणाऱ्या अ‍ॅडमिशन स्टॅम्पची एक प्रत झेरॉक्स करून अवश्य ठेवावी. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत पासपोर्ट हरवल्यानंतरचा ताण बऱ्यापैकी कमी होतो.

Web Title: Passport lost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.