होय, मला मुख्यमंत्री व्हायचंय!

By admin | Published: September 21, 2014 02:04 AM2014-09-21T02:04:35+5:302014-09-21T02:04:35+5:30

बेधडकपणा हा माझा स्वभावगुणच आहे आणि मी तो बदलणार नाही, असे बिनधास्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केले.

Yes, I want to be Chief Minister! | होय, मला मुख्यमंत्री व्हायचंय!

होय, मला मुख्यमंत्री व्हायचंय!

Next
यदु जोशी - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्रीपद पक्षाकडे चालून आले तर आपली मुख्यमंत्री होण्याची तयारी असेल, असे सांगत एखाद्या पदाची जबाबदारी जेव्हा माङयावर असते तेव्हा टीका पत्करून मी धाडसाने लोकहितासाठी बेधडक निर्णय घेतो. बेधडकपणा हा माझा स्वभावगुणच आहे आणि मी तो बदलणार नाही,  असे बिनधास्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केले.
कथित सिंचन घोटाळ्यातून विरोधकांनी आपली नकारात्मक प्रतिमा उभी केली. त्याचा फटका बसणार नाही का?
अजित पवार - राज्याच्या हितासाठी मी अनेक निर्णय घेतले. विदर्भ, मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कामांचा धडाका लावला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात क्.क्1 टक्के इतकेच सिंचन दहा वर्षात वाढल्याचा मुद्दा जाणीवपूर्वक हाताळला की सहज हे त्यांनाच माहिती. विरोधकांनी या मुद्याचा बाऊ करीत माझी बदनामी केली. तेव्हा धाडसाने निर्णय घेणो गरजेचे होते. तसे केले नाही तर रिझल्टस् मिळत नाहीत. सकाळी 7 पासून मी लोकांना भेटतो. कामे करतो, वेळ पाळतो अन् शब्दही. प्रसिद्धी न करता कामे करतो. तरीही माझी एक नकारात्मक प्रतिमा उभी केली गेली याची मला खंत आहे. चितळे समितीच्या अहवालातून सर्व सत्य समोर आले आहे. विरोधकांच्या आरोपांवर लोक विश्वास ठेवणार नाहीत. विरोधकांच्या टीकेला न घाबरता मी निर्णय घेत राहणार आहे. 
आपल्या बदनामीची मोहीम मुद्दाम राबविली गेली असे वाटते?
अजित पवार - माङयाविरुद्ध कोणी मुद्दाम मोहीम राबविली का, यावर मला बोलायचे नाही. माङयाकडे अनेकांनी अनेक प्रकारची माहिती आणून दिली. पण दुस:याच्या काठीने साप मारण्याचा माझा स्वभाव नाही. मी खोडा घालत नसतो.  तोंडावर बोलून मोकळा होत असतो. मला लक्ष्य केले गेले पण मी अमूक एका पक्षाचा आमदार आहे म्हणून कुणाचे काम केले नाही, असे एकतरी उदाहरण दाखवा असे माङो आव्हान आहे. 
कोणते मुद्दे घेऊन आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहात?
अजित पवार - आघाडी सरकारने केलेली चौफेर प्रगती, निर्माण केलेल्या सुविधा, आणलेल्या जनहिताच्या अनेक योजना, अशा सकारात्मक मुद्यांवर आम्ही लढू. विरोधकांच्या मुद्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. राष्ट्रवादीकडे फडर्य़ा वक्त्यांची भक्कम फळी आहे. महाराष्ट्रात मोदी फॅक्टर आहे पण लाट 1क्क् दिवसांतच ओसरताना दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही लाट दिसणार नाही. 
1999 पासून आपण राज्य मंत्रिमंडळात आहात. आपल्याला सर्वात  भावलेले मुख्यमंत्री कोण? 
अजित पवार - या काळात विलासराव देशमुख सवरेत्कृष्ट मुख्यमंत्री होते असे मला वाटते. ते सहका:यांवर विश्वास टाकायचे. मंत्र्यांनी, आमदारांनी आणलेली जनहिताची कामे फटक्यात करीत असत. कार्यकत्र्याला काय हवं, पक्षाला एखाद्या निर्णयाचा कसा फायदा होईल याचं त्यांना उत्तम भान होतं. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा कारभार संथ आहे असे मी म्हणत नाही. त्यांच्याच पक्षातील नारायण राणो, प्रशांत ठाकूर यांनी तसे आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझी कधीही कोंडी केली नाही. 
-मुख्यमंत्री चव्हाण यांच्या  कार्यशैलीबद्दल आपल्याला काय वाटतं?
अजित पवार - प्रत्येक व्यक्तीची कामाची एक शैली असते. चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. आदर्श घोटाळ्यानंतर ते महाराष्ट्रात आले. त्यामुळे त्यांनी प्रत्येक फाईल अतिशय बारीक बारीक तपशील पाहून निर्णय घेतले. त्यामुळे कारभार संथ झाला, असे वाटते.  
 
मला प्रसिद्धीचा सोस नाही
मी कधी प्रसिद्धीच्या मागे कधी धावलो नाही. मीडियाशी सलगी ठेवा असा सल्ला मला अनेकदा देण्यात आला पण मी कामे करीत राहिलो. सिद्धी विनायकाला दर्शनासाठी जायचे, एखाद्या दुर्घटनास्थळी जायचे तर त्या आधी कॅमे:यावाल्यांना सांगून ठेवायचे मग प्रसिद्धी मिळवायची हे धंदे मला जमले नाहीत अन् जमणारही नाहीत.
 

 

Web Title: Yes, I want to be Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.