कसली ब्लू प्रिंट, कोणाची ब्लू प्रिंट?

By Admin | Published: August 18, 2014 04:43 AM2014-08-18T04:43:45+5:302014-08-18T04:43:45+5:30

कसली ब्लू प्रिंट, कोणाची ब्लू प्रिंट, कोणी सांगितले रतन टाटा, मुकेश अंबानी आदित्य बिर्ला येणार? जे मला, टाटा, अंबानी किंवा बिर्लांनाही माहीत नाही,

Who is Blue Print, Whose Blue Print? | कसली ब्लू प्रिंट, कोणाची ब्लू प्रिंट?

कसली ब्लू प्रिंट, कोणाची ब्लू प्रिंट?

googlenewsNext

ठाणे : कसली ब्लू प्रिंट, कोणाची ब्लू प्रिंट, कोणी सांगितले रतन टाटा, मुकेश अंबानी आदित्य बिर्ला येणार? जे मला, टाटा, अंबानी किंवा बिर्लांनाही माहीत नाही, त्याच्या बातम्या येतात कुठून? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विकासासाठी मनसेने केलेल्या ब्ल्यू प्रिंट व त्याच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये या उद्योगपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या सादरीकरणाबाबतच्या चर्चा, तर्क-वितर्कांना पूर्णविराम दिला.
व्हॉटस् अ‍ॅपवर काहीतरी संदेश येतात आणि त्याच्या बातम्या बनतात, परंतु सोशल मीडियाचा जसा चांगला वापर होतो तसाच तो त्रासदायकही ठरू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजिण्यात आलेल्या मिक्ता (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अ‍ॅवार्ड्स) सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. सोशल मीडिया विरंगुळा म्हणूनच ठीक आहे, परंतु शक्यतो त्यापासून लांब राहावे. मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार म्हणून मला सतत विचारणा केली जाते, पण मला करायची तेव्हा मी प्रसिद्ध करेन. उगीच तुम्ही कशाला चर्चा करता, असे माध्यमांना फटकावून राज ठाकरे यांनी सोशल मीडिया आणि त्यावरून उठणाऱ्या अफवांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ज्या सोशल मीडियावरील बातम्यांना आणि मजकुराला ना आई ना बाप, त्याच्यावर माध्यमांनी अवलंबून राहू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Who is Blue Print, Whose Blue Print?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.