VIDEO - बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचे राज यांना विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 03:44 PM2016-08-24T15:44:43+5:302016-08-24T17:30:54+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र स्मारक साकारण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी अद्याप या स्मारकाला मुहूर्त मिळालेला नाही.

VIDEO - Rulers of Balasaheb Thackeray's museum forget about | VIDEO - बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचे राज यांना विस्मरण

VIDEO - बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचे राज यांना विस्मरण

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २४ -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र स्मारक साकारण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. इतकेच नव्हे तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत भेटही दिली. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी अद्याप या स्मारकाला मुहूर्त मिळालेला नाही.

 दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईत स्मारक साकारण्याच्या विषयावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली होती आणि शिवसेनाप्रमुखांच्या नावाने कल्याणकारी योजना राबविण्याची मागणी केली होती. नाशिकमध्ये मात्र नेमकी उलट भूमिका घेत राज ठाकरे यांनी गंगापूररोडवर महापालिकेच्या बंद पडलेल्या पंपिंगस्टेशनच्या आवारात बाळासाहेब ठाकरे स्मृती शस्त्रसंग्रहालय साकारण्याची घोषणा केली. त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावाचा विचार करता शस्त्रसंग्रहालय साकारणेच औचित्याला धरून असल्याचे मत त्यावेळी पुरंदरे यांनी व्यक्त केले होते. मात्र दोन वर्षांत येथे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही.

विशेष म्हणजे या नियोजित जागेवर नाशिकच्या इतिहासाचा पट उलगडणारे नाशिक इतिहास संग्रहालय स्थापन करण्याची महापालिकेची योजना होती. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत त्यासाठी मंजूर निधीतून एक मोठे आणि दोन छोटे हॉल बांधण्यात आले आहे. परंतु राज ठाकरे यांनी महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर हे काम थांबवून तेथे नवीन काही तरी करण्याची कल्पना मांडली होती. मात्र आता महापालिकेच्या यंदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीला संपण्यासाठी अवघा सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, अद्याप या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याइतपत तयारी नसल्याने लोकार्पण कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: VIDEO - Rulers of Balasaheb Thackeray's museum forget about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.