विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती!

By admin | Published: August 23, 2014 12:28 AM2014-08-23T00:28:28+5:302014-08-23T00:28:28+5:30

पावसाअभावी विदर्भातील फळपिकांना झळ पोहोचत असून, संत्र बहार गळती मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

Vidarbha's orange throttle leakage! | विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती!

विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती!

Next
अकोला : पावसाअभावी विदर्भातील फळपिकांना झळ पोहोचत असून, संत्र बहार गळती मोठय़ा प्रमाणात सुरू  झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 
राज्यात सर्वाधिक 1 लाख 5क् हेक्टर संत्र फळपिकाचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु या वर्षी बदलत्या हवामानाने या फळ पिकाचे लागवड क्षेत्र वाढू शकले नाही. 2क्क्5 साली वरुणराजाची अशीच अवकृपा झाली आणि शेतक:यांवर संत्र झाडे तोडण्याची वेळ आली होती.
 त्यावर्षी जवळपास 4क् ते 5क् हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे तोडण्यात आली होती. यावर्षीही तेच चित्र असून पाऊस नसल्याने आद्र्रता नाही. याशिवाय भूजल पातळी घसरल्याने जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे अगोदरच डिंक्या रोगाचा सामना करणा:या संत्र्यावर मुळकूज (कोलॅटोट्रायकम) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहार गळती वाढली आहे. राज्यातील इतर फळपिकांची अवस्थाही जवळपास तशीच आहे. 
रोजगार हमी योजना व नंतर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ पिकांचे लागवड क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. 
राज्यात केळी 82 हजार हेक्टर क्षेत्रवर असून, द्राक्ष 9क् हजार हेक्टर, पेरू  39 हजार, आंबा 4.82 लाख, 
पपई 1क् हजार, लिंबूवर्गीय फळे 
2.77 लाख, डाळिंब 78 हजार, 
चिकु 73 हजार, तर इतर फळ पिकांनी 4.18 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले
आहे; परंतु विविध रोगांचा सामना करणारा संत्र उत्पादक शेतकरी यंदा पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यात शेतीच्या कर्जाचा विषयही  गंभीर आहे.  (प्रतिनिधी)
 
च्ज्या शेतक:याकडे विहीरी किंवा कूपनलिकांची व्यवस्था आहे, ते शेतकरी या पाण्यावर फळबागा कशाबशा टिकवून आहेत; तथापि पावसाअभावी या जलस्त्रोतांचीही पातळी खालावली आहे. विदर्भात सिंचन प्रकल्पांची कामे होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. 
 
पावसाअभावी भूजल पातळी घसरली असून, तापमानात वाढ झाली आहे. परिणामी संत्र्याचा बहार गळण्यास सुरुवात झाली आहे. विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
- डॉ. शरदराव निंबाळकर,
ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 
विदर्भातील संत्र उत्पादक शेतकरी संत्र्यावर येणा:या डिंक्या रोगाचा सामना सतत करीत असतात़ तथापि या वेळी वातावरणात बदल झाला असून, पाऊस नसल्याने बुरशीजन्य कोलॅटोट्रायकम रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार औषधांची फवारणी करावी.
- डॉ. शामसुंदर माने, विभागप्रमुख (वनस्पतीरोग शास्त्र), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 

 

Web Title: Vidarbha's orange throttle leakage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.