वैतरणेचे पाणी गोदावरीत?

By Admin | Published: April 27, 2017 02:02 AM2017-04-27T02:02:37+5:302017-04-27T02:02:37+5:30

वैतरणेचे बारा टीएमसी पाणी गोदावरीत वळविण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून

Vaantana water on the wall? | वैतरणेचे पाणी गोदावरीत?

वैतरणेचे पाणी गोदावरीत?

googlenewsNext

औरंगाबाद : वैतरणेचे बारा टीएमसी पाणी गोदावरीत वळविण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी हा प्रश्न जलतज्ज्ञांकडून समजावून घेतला. गतवर्षीही यासंदर्भात जलतज्ज्ञ शंकरराव नागरे व इतरांनी राज्यपालांना निवेदन सादर करून चर्चा केली होती.
जायकवाडी धरणामुळे २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन अपेक्षित होते; परंतु ते प्रत्यक्षात सव्वा लाख हेक्टरने कमी झाले आहे. कारण भंडारदरा, दारणा, मुळा ही धरणे जादा क्षमतेची बांधल्यामुळे जायकवाडीत ३५ टीएमसी पाणी कमी येते. परभणीपर्यंत कॅनॉल बांधताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. वैतरणेचे जास्तीचे पाणी गोदावरीत वळवण्याच्या दिशेने पावले उचलण्याची विनंती शंकरराव नागरे, कृषितज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, एनजीओ चालक बडजाते यांनी राज्यपालांना केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vaantana water on the wall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.