रेडकांनी भरलेला ट्रक पळविणारे अटकेत

By admin | Published: May 30, 2016 03:46 AM2016-05-30T03:46:56+5:302016-05-30T03:46:56+5:30

रेडकांनी भरलेला ट्रक लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

A truck carrying a truck filled with racket | रेडकांनी भरलेला ट्रक पळविणारे अटकेत

रेडकांनी भरलेला ट्रक पळविणारे अटकेत

Next


मुंबई : रेडकांनी भरलेला ट्रक लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. सोलापूर येथून मुंबईच्या दिशेने रेडके भरून येणारा ट्रक मुरबाड रोड येथे अडवून या दरोडेखोरांनी चालक आणि क्लीनरला मारहाण केली. त्यानंतर ट्रक घेऊन ते पसार झाले होते.
अब्दुल रहीम मुन्ना खान, मोहम्मद सलीम कुरेशी, फराज मोहम्मद वकील कुरेशी, आसिफ अन्वर मुल्ला, शेरअली ऊर्फ समीर अब्दुल सत्तार चौधरी, आसिफ अकबर शेख, शब्बीर शाहबाज शेख आणि अज्जू शब्बीर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणारे तक्रारदार निजाम सरदार कुरेशी यांच्या जवळच्या मित्रांचा ट्रक सोलापूर येथून म्हशींची रेडके घेऊन मुरबाडमार्गे मुंबईतील देवनार येथे येत होते. त्याच दरम्यान मुरबाड रोडवर सहा जणांनी ट्रक अडविला. ट्रकचालक व क्लीनरला शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर या सहा लुटारूंनी रेडकांनी भरलेल्या ट्रकसह पळ काढला. याप्रकरणी तक्रारदार निजाम यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुरबाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ट्रकचालक आणि क्लीनरला अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी गोवंडी, कुर्ला परिसरात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत यांना मिळाली. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी परिसरात सापळा रचून फराज मोहम्मद वकील कुरेशीच्या मुसक्या आवळल्या.
> चोरीचा ट्रक कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हस्तगत केला असून, आरोपी आणि मुद्देमाल मुरबाड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

Web Title: A truck carrying a truck filled with racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.