मिरजेत शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Published: February 8, 2016 04:29 AM2016-02-08T04:29:22+5:302016-02-08T04:29:22+5:30

मिरजेतील माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. छेडछाडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

Schoolgirl's suicide in Miraj | मिरजेत शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

मिरजेत शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

googlenewsNext

मिरज : मिरजेतील माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. छेडछाडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
श्वेता अरविंदसिंग ठाकूर (१३) असे या मुलीचे नाव असून ती रोझरी स्कूलमध्ये आठवीत शिकत होती. रविवारी दुपारी आईला दुचाकीवरून बाजारात सोडून घरी परत आल्यानंतर तिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तासाभराने आई परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्वेताचे वडील हातकणंगले रेल्वे स्थानकात तिकीटविक्री लिपिक म्हणून काम करतात. अभ्यासात हुशार व खेळात प्रावीण्य असलेल्या श्वेताला समतानगर येथील पवन नावाचा तरुण वारंवार त्रास देत होता, अशी चर्चा होती. वर्षभरापूर्वी श्वेताच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणास पोलीस ठाण्यात आणून समज दिल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यानंतरही तो श्वेताला त्रास देत होता. चार दिवसांपूर्वी शाळेजवळ पवन व त्याचे मित्र श्वेताला छेडत असताना शाळेतील शिक्षकांनी त्यांना पिटाळून लावले होते. पवन हा वारंवार धमकावत सलगीचा प्रयत्न करीत असल्याने श्वेता हिने आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला. (वार्ताहर)

Web Title: Schoolgirl's suicide in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.