प्रचारात डबेवाल्यांची आघाडी!

By admin | Published: September 2, 2014 01:36 AM2014-09-02T01:36:39+5:302014-09-02T01:36:39+5:30

विधानसभा निवडणुकांच्या तारखा, आचारसंहिता कधी लागणार? जागावाटपाची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र असताना मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र निवडणूक प्रचारात बाजी मारली आहे.

Prominent leadership in the campaign! | प्रचारात डबेवाल्यांची आघाडी!

प्रचारात डबेवाल्यांची आघाडी!

Next
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तारखा, आचारसंहिता कधी लागणार? जागावाटपाची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र असताना मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र निवडणूक प्रचारात बाजी मारली आहे. आगामी निवडणुकीसाठी गल्लोगल्ली प्रचार फेरी काढत डबेवाल्यांनी भायखळा, शिवडी मतदारसंघ प्रचार करीत पिंजून काढला आहे.
डबेवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी राजकारणात उडी घेण्याचे ठरविले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र डबेवाल्यांनी शिवसेना ‘जो निर्णय घेईल तो घेईल’ अशी भूमिका घेत थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. भायखळा, शिवडी मतदारसंघात दोनशेच्या आसपास डबेवाले काम करतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातून घराघरांत ‘आमचा डबेवाला बांधव विधानसभा निवडणूक लढवणार आहे, तेव्हा आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे,’ असा संदेश देत आहेत. त्यामुळे आता या माध्यमातून डबेवाल्यांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराचा ‘श्रीगणोशा’ केला असून, त्यांचे डोळे मात्र ‘मातोश्री’च्या निर्णयाकडे लागून राहिले आहेत.
गेल्या काही वर्षात गिरणी कामगार आणि माथाडी कामगार यांनी राजकारणात सक्रिय होत आपले प्रश्न मांडले. त्याच पाश्र्वभूमीवर डबेवाल्यांनीही राजकारणात प्रवेश करण्याचा निश्चय केला असून, प्रचारासाठी धडपड करण्यास सुरुवात केली आहे. एकंदर अजूनही इतर राजकीय पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी यांचे वाद-प्रतिवाद सुरू असताना डबेवाल्यांनी मात्र यातून वाट काढत प्रचारातच आघाडी पटकावली आहे. (प्रतिनिधी)
 
उद्धव ठाकरेंना ‘डबा भेट’
‘मातोश्री’वरून इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणो आल्यास मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘डबा’ भेट देण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणो, या मुलाखतीसाठी डबेवाले सायकलवरून मातोश्रीवर पोहोचणार आहेत. 

 

Web Title: Prominent leadership in the campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.