सध्या सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात - उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

By admin | Published: May 29, 2014 04:29 PM2014-05-29T16:29:58+5:302014-05-29T17:09:37+5:30

सध्या सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत असा सणसणीत टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

Now everyone has the dream of Chief Minister - Uddhav Thackeray's Raj Thackeray hits | सध्या सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात - उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

सध्या सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात - उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Next

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २९ - मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा आहे. पण सध्या सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत असा सणसणीत टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.  
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवावी याविषयी मनसेच्या बैठकीत चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. 'मी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी कार्यकर्तेच माझ्याकडे करतात. पण सध्या अनेकांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडतात असा टोला ठाकरेंनी लगावला.
जम्मू - काश्मीरमधील कलम ३७० वर चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करावी असे वक्तव्य ठाकरेंनी केले आहे. उणीदुणी काढण्याऐवजी कामावर लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मोदींच्या अजेंड्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केले आहे. शिवसेनेला जनतेशी संबंध असलेल्या खाते द्यावी अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Web Title: Now everyone has the dream of Chief Minister - Uddhav Thackeray's Raj Thackeray hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.