‘स्वातंत्र्यलढ्यात वर्तमानपत्राचा शस्त्रासारखा वापर केला गेला’

By Admin | Published: January 20, 2017 03:34 AM2017-01-20T03:34:21+5:302017-01-20T03:34:21+5:30

स्वातंत्र्य लढयामध्ये वर्तमान पत्राचा वापर हा धारदार शस्त्रा सारखा करण्यात आला

'The newspaper was used as a weapon in freedom struggle' | ‘स्वातंत्र्यलढ्यात वर्तमानपत्राचा शस्त्रासारखा वापर केला गेला’

‘स्वातंत्र्यलढ्यात वर्तमानपत्राचा शस्त्रासारखा वापर केला गेला’

googlenewsNext


बोईसर : स्वातंत्र्य लढयामध्ये वर्तमान पत्राचा वापार हा धारदार शस्त्रा सारखा करण्यांत आला परंतु वत्तपत्र व पत्रकारितेत स्वतंत्र्यापासून आता पर्यंत झालेला बदल हा खुप मोठा कालखंड असल्याचे मत लोकमत वृत्त समुहाचे निवासी संपादक संजीव साबडे यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाला १६० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त मुंबई विद्यापीठाने विविध महाविद्यालयात १६० व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्या नुसार संजीव साबळे यांनी डहाणू तालुक्यातील चिंचणीच्या पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मराठी पत्रकारिता या विषयावर संवाद साधला. या वेळी प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, संस्थेचे सचिव महेंद्र चुरी, प्राद्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी वृत्तापत्राचा इतिहास उलगडून दाखवताना साबळे यांनी अग्रलेखाला पूर्वी वैचारिक नेतृत्व करणारा नेता मानले जायचे १९२५ ते १९६० या काल खंडात आपल्या कडे शिक्षणाचे प्रमाण कमी होते म्हणून राजकीय तसेच सोशल निर्णय घेताना अग्रलेख वाचून निर्णय घ्यायचे परंतु जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले तसे प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतंत्र पणे विचार करु लागला. आता भूमिका बदलली असून अग्रलेख वाचून आपापले मत ठरविले जात असल्याचे सांगितले.
वर्तमानपत्रात आणि पत्रकारीता क्षेत्रात असलेल्या संधी विषयी सांगताना सद्या खुप टी व्ही चॅनेल आहेत. त्यामध्ये मोठे करियर म्हणून विचार करा. इलेक्टोनिक मिडियाचे जग संपूर्ण वेगळे आहे. तुम्हाला पत्रकारीता क्षेत्रात जायल नक्की आवडेल असा विश्वास साबडेनी व्यक्त करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची परिपूर्ण पणे उत्तरे दिली. व्याख्याना च्या कार्यक्र माचे सूत्रसंचलन प्रा. प्रकाश सोनावणे तर आभार प्रा. प्रेरणा राऊत यांनी मानले.(वार्ताहर)
>वृत्तपत्रे आता सन्फॉर्मेशन सेंटर बनली आहेत
वृत्तपत्रातील झालेला बदला व बदललेल्या स्वरूपा विषयी बोलताना वाचकांची गरज ओळखून बातम्या प्रसिद्ध केल्या जातात एकेकाळी शस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रा कडे इन्फॉरमेशन सेंटर तसेच सर्वांगीण माहिती देणारे माध्यम म्हणून आज आदराने पाहिले जाते.
तसेच आता व्यापार, आर्थिक, खेळ, आरोग्य, वाइल्ड लाईफ करियर, मनोरंजन इ. विविध प्रकारची माहिती व न्याय देणाऱ्या सदरांच्या गरजे संदर्भात चांगली व विस्तृत माहिती साबडे यांनी दिली.

Web Title: 'The newspaper was used as a weapon in freedom struggle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.