दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:47 PM2024-04-16T21:47:06+5:302024-04-16T21:47:48+5:30

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे...

lok sabha election 2024 Maharashtra opinion poll NDA 28 seats, INDIA 20 seats; How many seats will congress eknath shinde uddhav Thacker sharad pawar ajit pawar shiv sena NCP TV9 Polstrat Opinion Poll | दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

देशात लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानतंर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही सर्वच पक्षांचा जबरदस्त प्रचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यात मोठ-मोठ्या राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या. या मुळे, या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. यातच, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे. 

याच बरोबर, I.N.D.I.A. ला 20 जागा मिळताना दिसत असून. यांपैकी 10 जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे टीव्ही 9, पीपल्स इनसाइट पोलस्ट्रॅटने केला आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व्हेमध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. उमेदवारांचा विचार करता या सर्व्हेमध्ये नागपूरमधून नितिन गडकरी, बारामतीतून सुप्रिया सुळे तर उत्तर मुंबईतून पियूष गोयल विजयी होताना दिसत आहेत.

कुणाला किती जागा - 
भाजप - 25 
काँग्रेस- 05 
शिवसेना (शिंदे गट) – 03 
एनसीपी(अजित गट) – 00 
शिवसेना(उद्धव गट) – 10 
एनसीपी(शरद पवार गट) – 05 
इतर - 00

कुणाला किती टक्के मते मिळणार?
मतांच्या टक्केवारीचा विचार करता एनडीएला 40.22 टक्के, I.N.D.I.A. ला 40.97 टक्के तर इतरांना 3.22 टक्के, तर 15.59 टक्के मते निश्चित नाहीत.

महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेमध्ये लोकसभा मतदारसंघांतर्गत याणाऱ्या प्रत्येक विधानसभा मदार संघातून सॅम्पल घेण्यात आले आहेत. हा सर्व्हे 1 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत करण्यात आला. यात देशभरातील 4123 विधानसभा मतदार संघातील सम्पल घेण्यात आले.
 

Web Title: lok sabha election 2024 Maharashtra opinion poll NDA 28 seats, INDIA 20 seats; How many seats will congress eknath shinde uddhav Thacker sharad pawar ajit pawar shiv sena NCP TV9 Polstrat Opinion Poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.