उद्योगांनी नेतृत्वाची फळी तयार करावी

By admin | Published: September 19, 2014 01:02 AM2014-09-19T01:02:14+5:302014-09-19T01:02:14+5:30

उद्योगामध्ये एका ठरावीक कालावधीनंतर काही अडचणी निर्माण होतात. त्या केवळ आर्थिक पातळीवरील नसतात, तर अनेकदा कुशल नेतृत्वाचीही कमतरता भासते.

The leadership of the industry should be prepared | उद्योगांनी नेतृत्वाची फळी तयार करावी

उद्योगांनी नेतृत्वाची फळी तयार करावी

Next
पुणो : उद्योगामध्ये एका ठरावीक कालावधीनंतर काही अडचणी निर्माण होतात. त्या केवळ आर्थिक पातळीवरील नसतात, तर अनेकदा कुशल नेतृत्वाचीही कमतरता भासते.  उद्योगांनी आपल्या व्यवस्थापनामध्ये कुशल नेतृत्व असलेल्या तज्ज्ञांची फळी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी येथे व्यक्त केले.
ओम प्रकाशनतर्फे संपादित  ‘ब्राrाण उद्योगरत्ने’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, प्रकाशनचे मुख्य संपादक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे, कार्यकारी संपादिका जयश्री धुपकर उपस्थित होत्या. ब्राrाण समाजातील 24 यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा या पुस्तकामध्ये मांडण्यात आल्या आहेत. या उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये विनायक पंडीत,  सुभाष अनगळ, जयंत फडके, डॉ. अरूण जोशी, अमोल अत्रे, राजीव आपटे, रविंद्र मंकणी, सुधीर मांडके, रवी धोत्रे, अजित चाफळकर, जितेंद्र जोशी, रविंद्र प्रभुदेसाई, मिलिंद मराठे, अनिल यार्दी, आर. डी. देशपांडे, श्यामकांत मेंगाळे, डॉ. श्रीरंग गोखले, राजेश कुलकर्णी, अॅड. उदय कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, अजित अकोलकर, सदानंद देशपांडे, शेखर चरेगावकर, अरविंद सुरंगे यांचा समावेश आहे. 
 चौधरी म्हणाले, ‘‘नावीन्यता, दूरदृष्टी, नेतृत्वगुण, आव्हान स्वीकारण्याची तयारी ही कौशल्ये उद्योजकामध्ये असतात. अडचणींना सामोरे जाण्यासाठी व्यवस्थापनामध्ये नेतृत्व करू शकणा:या तज्ज्ञांची फळी असली पाहिजे. हा दररोजच्या व्यवस्थापनातला भाग असून, अनेक उद्योग त्यात कमकुवत ठरतात. उद्योगाला पुढे नेण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. कॉर्पोरेट उद्योजकता ही काळाची गरज बनली असून, त्याचा समावेश व्यवस्थापन अभ्यासक्रमात करणो आवश्यक आहे.’’ 
हर्डीकर यांनी पुस्तकाची माहिती दिली. यापुढील काळात ब्राrाण समाजासाठी उद्योग संजीवनी, उद्योग वारसा व नवउद्योजक अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले. मीनल ओर्पे यांनी सूत्रसंचालन केले. संजय ओर्पे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
नावीन्यावर पाहिजे भर : प्रभुदेसाई
4उद्योग क्षेत्रबद्दल मुलांना लहान वयातच प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. शिकारपूर म्हणाले, की समाजानेही आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. सध्या देश चांगल्या स्थितीतून जात आहे. जागतिकीकरण, आऊटसोर्सिगमुळे सर्व उद्योजकांचा फायदा होणार आहे. उद्योजकांनी सातत्याने नावीन्यतेवर भर द्यायला हवा. उद्योजक हा त्याच्या व्यवसायाचा राजा आहे, तर विपणनक्षमता ही त्या उद्योजकाचे सैनिक असते, असे प्रभुदेसाई यांनी नमूद केले.

 

Web Title: The leadership of the industry should be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.