राज्यात उष्णतेची लाट, राज ठाकरे यांनी सरकार आणि जनतेला केलं महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:14 PM2024-04-16T13:14:55+5:302024-04-16T13:16:48+5:30

Heat wave in the Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी एक पत्र लिहून राज्य सरकारसह, महाराष्ट्र सैनिक आणि राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

Heat wave in the Maharashtra, Raj Thackeray made an important appeal to the State government, Maharashtra Sainik's and people | राज्यात उष्णतेची लाट, राज ठाकरे यांनी सरकार आणि जनतेला केलं महत्त्वाचं आवाहन

राज्यात उष्णतेची लाट, राज ठाकरे यांनी सरकार आणि जनतेला केलं महत्त्वाचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून राज्य सरकारसह राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुलांना तातडीने उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शाळांना द्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच निराधार, बेघर लोक आणि प्राणी पक्षांना पुरेसं पाणी मिळेल याची तजवीज करावी, असं आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना केलं आहे.

सरकार आणि जनेतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे लिहितात की, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे, असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे पुढे लिहितात की, उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसेच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात ते प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. त्याबरोबरच प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. 

Web Title: Heat wave in the Maharashtra, Raj Thackeray made an important appeal to the State government, Maharashtra Sainik's and people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.