गुगल सर्चद्वारे अल्पवयीन मुलाच्या हत्येचा लागला छडा

By Admin | Published: March 28, 2017 02:40 PM2017-03-28T14:40:48+5:302017-03-28T14:40:48+5:30

गुगल सर्चच्या आधारे पोलिसांनी एका 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा लावला आहे. 7 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बाहेर एक बॅगमध्ये रणधीर साहनीचा मृतदेह आढळून आला होता.

Google search launched the murder of a minor child | गुगल सर्चद्वारे अल्पवयीन मुलाच्या हत्येचा लागला छडा

गुगल सर्चद्वारे अल्पवयीन मुलाच्या हत्येचा लागला छडा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - गुगल सर्चच्या आधारे पोलिसांनी एका 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा लावला आहे. 7 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बाहेर एक बॅगमध्ये रणधीर साहनीचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचा गुंता गुगलमुळे पोलिसांना सोडवता येऊ शकला आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. यातील रणविजय साहनी (20), रेणुदेवी (35) आणि शिवनाथ (36) अशी प्रमुख आरोपींची नावं आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपींनी रणधीरची हत्या करुन त्याच्या आईला सव्वा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन बिहारमध्ये पाठवलं. शिवाय, रणधीरचे आजारामुळे निधन झाल्याचंही खोट सांगितलं. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रणधीर बिहारच्या वैशाली शहरातील रहिवासी होता. मुंबईमध्ये तो रणविजयच्या बांगड्यांच्या कारखान्यात कामाला होता. रणविजय आणि अन्य आरोपी काही वर्षापूर्वीच मुंबईत आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी किरकोळ कारणावरुन रणधीर आणि रणविजयमध्येही वाद झाला. यावेळी रागाच्या भरात रणविजयने रणधीरचा गळा दाबला.
 
दरम्यान, रणविजयच्या मनात त्याला ठार करण्याचा कोणताच कट नव्हता. पण गळा दाबल्यामुळे रणधीर काही वेळा बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली. यानंतर सर्वांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना आखली. यावेळी रणधीरचा आजाराने निधन झाले असून सांगून त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचं ठरवण्यात आले.
 
त्याचा मृतदेह ट्रेननं नेण्यासाठी रणविजयने मालाडहून एक मोठी बॅग विकत घेतली. रणधीरच्या मृतदेहावरील आधीचे कपडे बदलण्यात आले. यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी बिहारकडे एक मालगाडी जाणार होती. मृतदेह असलेली बॅग स्टेशनवर घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच स्कॅनर मशीन आरोपींनी पाहिली. व घाबरुन त्यांनी बॅग स्टेशनबाहेरच सोडली. ही बॅग ट्रॅव्हल गो कंपनीची होती. 
 
हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी गुगल सर्चद्वारे या कंपनीचा तपशील काढण्यास सुरुवात केली, त्यावेळी मुंबईतील नळ बाजारात त्याचे एक ऑफिस असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी ट्रॅव्हल गोच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारपूस केली तेव्हा या बॅगचे वितरण मालाड, कुरार, गोरेगाव आणि बोरिवलीतील निरनिराळ्या भागात केले जात असल्याचे समजलं. तपास पथकाने मग त्या-त्या ठिकाणी जाऊन संबंधित दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यावेळी मालाडमधील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रणविजय व कृष्णा नावाचे आरोपी 1400 रुपयांने बॅग खरेदी करताना दिसले, याच कंपनीच्या बॅगमध्ये रणधीरचा मृतदेह मिळाला होता. 
 
यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र छापून मालाड, कुरारपासून ते पश्चिम उपनगरांत वाटले. या सर्व  घडामोडींमध्ये पोलिसांनी रणविजयच्या बांगड्यांच्या कारखान्याची माहिती मिळाली. व याद्वारे पोलिसांनी रणविजय व कृष्णाच्या मुसक्या आवळल्या. या दोघांच्या अटकेनंतर बिहारमधून चार जणांना ताब्यात घेण्यात आले.  अशा प्रकारे पोलिसांनी गुगल सर्चच्या माध्यमातून हत्या प्रकरणात छडा लावला. 

Web Title: Google search launched the murder of a minor child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.