भविष्यातील ‘साहसी’ वाटचाल !

By Admin | Published: August 30, 2015 12:19 AM2015-08-30T00:19:57+5:302015-08-30T00:19:57+5:30

स्पेनच्या ‘कॅसलर्स’चा थरार अनुभवण्याची संधी मिळाली, तो अनुभव अत्यंत थरारक व रोमांचकारी होता. मात्र स्पेनहून आल्यानंतर दहीहंडीविषयी विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

The future 'adventure' is going on! | भविष्यातील ‘साहसी’ वाटचाल !

भविष्यातील ‘साहसी’ वाटचाल !

googlenewsNext

- बाळा पडेलकर
अध्यक्ष (दहीहंडी समन्वय समिती)

स्पेनच्या ‘कॅसलर्स’चा थरार अनुभवण्याची संधी मिळाली, तो अनुभव अत्यंत थरारक व रोमांचकारी होता. मात्र स्पेनहून आल्यानंतर दहीहंडीविषयी विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. याविषयी गोविंदा पथकांशी संवाद साधून, शिवाय काही ज्येष्ठ गोविंदांच्या मार्गदर्शनानंतर दहीहंडीला साहसी खेळात समाविष्ट करण्याची मागणी सर्वांसमोर आली. त्यानंतर कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर अखेरीस दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी २०१५ साल उजडावे लागले.

स्पेनच्या कॅसलर्सची आॅम्लिपिकमध्ये वाटचाल करण्यासाठी सुरू असणारी मेहनत पाहून आपणही आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी या खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजेत, असा सर्व गोविंदांचा निर्धार आहे.कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब या खेळांना ज्याप्रमाणे क्रीडा प्रकारात महत्त्व दिले आहे, त्याच पद्धतीने थरारक मानवी मनोरे रचणे हा क्रीडा प्रकार असल्यामुळे या खेळालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या साहसी खेळाची निश्चित नियमावली जाहीर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे खेळ म्हटल्यानंतर त्याला सरकारचे सर्व क्रीडा पुरस्कार लागू होणार का? जास्त गुणांसाठी यातील गोविंदाचा विचार होणार का? नोकऱ्यांसाठी गोविंदांना प्राधान्य मिळणार का? असे अगणित प्रश्न यानिमित्ताने भेडसावत. साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य शासनानाकडून मिळण्याची अपेक्षा आहे.
साहसी खेळांतील प्रगतीकडे पाहिले तरी आपल्याला थक्क व्हायला होते. याबाबतीत मानवी क्षमता, त्याची मानसिकता, खेळासाठीचे तंत्रज्ञान, संशोधन व सुरक्षितता यांचा खूप अभ्यास करावा लागतो. साहसी खेळ जीवाची बाजी लावून खेळले जातात. त्यात कोणीही जीव गमावू नये, म्हणून उत्तम प्रतीची अनेक जीवरक्षक साधने तयार केली आहेत. गिर्यारोहण, माउंटन बाईकिंग, स्किइंग इ. साहसी खेळांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना अशा खेळांचा व अशा खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा दर्जा व नियम निश्चित करतात. हे नियम काटेकोरपणे पाळण्याकडे सर्वांचाच कल असतो अन्यथा जीव गमावण्याची शक्यता असते. वेडे साहस करण्याइतके ते उत्साहित होत नाहीत. दहीहंडीतील मनोऱ्यांना खेळ म्हणायचे असेल तर प्रथम त्याचे काही नियम करावे लागतील. गोविंदांचा जीव जाऊ नये, जखमी होऊन अपंगत्व येऊ नये, म्हणून काही साधने विकसित करावी लागतील. त्यासाठी पृथक्करण, अभ्यासू व संशोधनवृत्तीला प्रोत्साहन द्यावे लागेल. विशेष म्हणजे पुढे ही साधने वापरण्याची सक्ती व अनिवार्यता करावी लागेल.
साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर आता या खेळातील गोविंदांची काळजी व त्यांच्यासाठी सुरक्षिततेची साधने विकसित करण्यासाठी व वापरण्यासाठी उत्तेजन देण्याची आवश्यकता आहे. अनेक गोविंदा जखमी होतात, प्राणास मुकतात त्यांची कारणे शोधण्याची अभ्यासू वृत्ती जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली गेली पाहिजे. तोबा गर्दीतून जखमी व्यक्ती रुग्णवाहिकेपर्यंत लवकरात लवकर कसा पोहोचेल, याचे नियमन करावे. गोविंदांचे जीव वाचवणे, त्यांच्यावरील झालेल्या इलाजांची तजवीज करणे, या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत. दहीदंडीला साहसी खेळांच्या दर्जाइतपत उंचावण्यापेक्षा तो सुरक्षित खेळ कसा होईल ते पाहावे, त्यातूनच हा साहसी खेळ अधिक लोकप्रिय होईल. दहीहंडीतील प्रत्येक गोविंदा या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कमीलाचा उत्सुक असला, तरीही ही प्रक्रिया सोपी नाही. शासनाने केवळ घोषणा करणे आणि तो खेळ प्रत्यक्षात उतरविणे यात बराच काळ लोटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यामुळे खचून न जाता गोविंदा यासाठी कायम प्रयत्न करीत राहील. दहीहंडी या साहसी खेळाचे भविष्य न्याहाळताना परदेशातील स्पर्धकांचा आढावा घेतला पाहिजे. आॅलिम्पिकचा विचार करताना स्पेनच्या कॅसलर्सने मात्र नव्वदीच्या दशकातच सहजगत्या नऊ- दहा थरांचा टप्पा पार केला होता, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे केवळ उत्सव म्हणून याकडे न पाहता सरावातील सातत्य, खेळाडूंचा फिटनेस, शिस्तबद्ध पद्धतीन मनोरे रचणे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे या सर्वांचा विचार गोविंदा पथकांनी केला पाहिजे. (शब्दांकन : स्नेहा मोरे)

राज्य शासनाने क्रीडा धोरणात साहसी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर स्थापण्याचे २०११ साली प्रस्तावित केले होते. साहसी खेळांना प्रशिक्षण मिळावे आणि खेळांचा विकास व्हावा, हा यामागील उद्देश होता. त्यामुळे या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरच्या स्थापनेबाबत हालचाल करायला हवी होती. साहसी खेळांचे प्रशिक्षण, सुविधा, संस्थांना परवानग्या, मान्यता, उपक्रमाचे नियोजन, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींचा समावेश या प्रस्तावित सेंटरमध्ये करण्यात आला आहे. पण आजतागायत या सेंटरसाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळालेला नाही. यावरूनच साहसी खेळांबाबत शासनाची उदासीनता स्पष्टपणे लक्षात येते.

Web Title: The future 'adventure' is going on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.